सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक : धनशक्तीसमोर जनशक्तीचे मोठे आव्हान; महाविकास आघाडीच्या विजयाचा दांडगा विश्वास.

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक : धनशक्तीसमोर जनशक्तीचे मोठे आव्हान; महाविकास आघाडीच्या विजयाचा दांडगा विश्वास.

By Satyajeet News
December 2, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीने यंदा केवळ सत्ताबदलाचा प्रश्न न राहता हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा व्यापक अर्थ धारण केला आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महाविकास आघाडी) व अपक्ष उमेदवारांच्या रिंगणामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे.

शेंदुर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांपासून नगरपंचायतीवर महिलांचे राजकारण सुरू असले तरी प्रत्यक्षात महिला नगराध्यक्षांना केवळ कठपुतली बनवून काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मनमानी कारभार केला गेल्याचे गंभीर आरोप सध्या चर्चेत आहेत. या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह भाजपातीलच अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

हीच नाराजी उघडपणे व्यक्त करत भाजपचे काही एकनिष्ठ कार्यकर्ते, मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी निष्ठा राखत, मात्र स्थानिक नेतृत्वाच्या हुकूमशाहीला कंटाळून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले. हा बंडखोरीचा सूर सत्ताधारी पक्षासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

दरम्यान, निवडणुकीतील मतदानावर नाराजीचा परिणाम होणार, याची चाहूल लागताच मते मिळवण्यासाठी देवाणघेवाणीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. ‘पाण्यात राहून माशाशी वैर नको’ या भूमिकेतून काही मतदारांनी येणाऱ्या लक्ष्मीचा स्वीकार केला, मात्र मताचा अधिकार वापरताना हुकूमशाहीला छेद देण्यासाठी सरस्वतीला महत्त्व देत मतदान केल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख निर्माण करून देणारे स्व. गजाननराव गरुड यांच्या संस्कारांची वारसा असलेल्या त्यांच्या कन्या काशीद उज्वलाताई सतीश यांच्या नेतृत्वावर मतदारांनी भरभरून विश्वास टाकत महाविकास आघाडीला निर्णायक साथ दिल्याची जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे भाजपविरोधात उभे ठाकलेले काही अपक्ष उमेदवारही निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे सत्ताधारी गटाची गणिते विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेचा दुरुपयोग करून जनतेच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना यावेळी घरी बसावे लागेल की काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी एका बाजूला भाजपचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार काशीद उज्वलाताई सतीश यांच्यात सरळ लढत होत आहे. जर या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले, तर तो निकाल केवळ शेंदुर्णीपुरता मर्यादित न राहता मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यासाठीही राजकीय दृष्ट्या मोठा धक्का मानला जाईल, यात तिळमात्र शंका नाही.

एकूणच, शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक ही धनशक्तीच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा प्रयत्न आणि जनतेच्या जागृत मतातून परिवर्तन घडवण्याची उमेद यांच्यातील निर्णायक लढत ठरत असून, जनशक्तीचाच विजय होईल असा ठाम विश्वास सध्या व्यक्त केला जात आहे. असे असले तरी सरतेशेवटी मतदान प्रक्रिया ही गुप्त असते म्हणून खरे काय आणी खोटे काय याबाबत सर्व चित्र मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 329
Previous Article

जामनेर नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाचा भांडाफोड; दोन ...

Next Article

नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला; उच्च न्यायालयाच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची हिटलर शाही, सुट केलेले व्याज भरण्यासाठी शेतकऱ्यांना सक्ती.

    March 20, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    नवरदेव घोड्यावर तर वऱ्हाड वाऱ्यावर, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

    May 14, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    अज्ञात व्यक्तीने तन नाशक फवारल्याने दोन एकर कापूस जळुन खाक, कुऱ्हाड खुर्द येथील घटना.

    August 11, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    “हम बने, तुम बने एक दुजे के लिए” पाचोरा शहरात प्रेमीयुगलांची गळफास लावून घेत आत्महत्या.

    June 26, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    ना. गिरीशभाऊंच्या आवाहनाला प्रतिसाद, आपत्तीग्रस्तांसाठी संजयदादा गरुड यांच्याकडून सात लाखांचा निधी.

    September 28, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

    May 20, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    वरखेडी येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.

  • पाचोरा तालुका.

    जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शेरी पाझर तलावात शेतकऱ्याने केला मातीचा भराव, अरुण पवार यांची तक्रार.

  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी, भोकरी गाव परिसरात जुने मोबाईल लॅपटॉप व सी. पी. यू. खरेदीचा व्यवसाय तेजीत, चोरीच्या मोबाईलची खरेदीविक्री होत असल्याचा संशय.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज