सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›जामनेर नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाचा भांडाफोड; दोन प्रकरणे उघड, पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल.

जामनेर नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाचा भांडाफोड; दोन प्रकरणे उघड, पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल.

By Satyajeet News
December 2, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५

जामनेर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान गंभीर स्वरूपाचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मतदानाच्या दिवशीच वार्ड क्रमांक १० मध्ये बोगस मतदानाचे दोन स्पष्ट प्रकार समोर आले असून, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे तालुकाध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जामनेर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदार संघात मतदान सुरू असताना वार्ड क्रमांक १० मध्ये पहूर कसबे येथील रहिवासी रोशन विनोद चौधरी हा प्रत्यक्ष मतदार नसताना बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे अधिकृत उमेदवार आकाश उर्फ पवन बंडे यांनी त्याला रंगेहात पकडून तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याच वार्डमध्ये आणखी एका गंभीर घटनेचा उलगडा झाला. श्रद्धा सुनील बोहरा या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून एका तरुणीने मतदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय येताच संबंधित तरुणीला पकडण्यात आले. आधार कार्डवरील छायाचित्र आणि प्रत्यक्ष व्यक्ती यामध्ये स्पष्ट तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने हे कार्ड बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बनावट आधार कार्डची छायांकित प्रत पोलिस स्टेशन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त, वार्ड क्रमांक ८ व ९ मध्येही बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित आरोपी पळून गेल्याने त्यांना पकडता आले नसल्याची माहितीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

किशोर पाटील यांनी आपल्या तक्रारीत बोगस मतदान, खोटे दस्तऐवज तयार करणे व मतदार याद्यांच्या गैरवापरासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच जामनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या बोगस आधार कार्ड तयार करणाऱ्या रॅकेटची उच्चस्तरीय चौकशी करून ते उध्वस्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

निवडणूक प्रक्रियेची पवित्रता आणि मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी निवडणूक आयोग व पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जामनेर नगरपरिषद निवडणूक चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, प्रशासन पुढे काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 874
Previous Article

मतदान–मतमोजणीतील अंतरामुळे ईव्हीएमवरील संशय अधिक गडद.

Next Article

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक : धनशक्तीसमोर जनशक्तीचे मोठे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    डांभुर्णी, चिंचपुरे, पिंपळगाव हरेश्वर परिसरात बिबट्याची दहशत, पशुधन पालक संतप्त.

    May 6, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    खडकदेवळा खुर्द येथे विषबाधा होऊन सहा म्हशी व एक रेड्याचा मृत्यू, शेतकऱ्याचे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान.

    December 3, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    राज्य उत्पादन शुल्क तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत.

    November 8, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    लाडकी बहिण योजना हि अफूची गोळी, चिमुकल्यांच्या आयुष्याची झाली होळी. बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध करतांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी गरजल्या.

    August 21, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    लाईनमन अविनाश राठोड याची बदली झाल्याने, अंबे वडगाव करांची साडेसाती संपली.

    December 25, 2022
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

    November 8, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड खुर्द येथील अवैध धंदे बंद झाल्याने माता भगिनी घेतला मोकळा श्वास, मंत्री, आमदार व पोलीसांचे मानले आभार.

  • आरोग्य

    स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमीत्त वृंदावन हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबीर.

  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवाड्याच यशस्वी नियोजन सुरवात.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज