सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला ‘पूर्णविराम’ १ डिसेंबर रात्री १० नंतर जाहिरातींवर बंदी. मतदानादिवशी मुद्रित-डिजिटल माध्यमांत प्रचार निषिद्ध.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला ‘पूर्णविराम’ १ डिसेंबर रात्री १० नंतर जाहिरातींवर बंदी. मतदानादिवशी मुद्रित-डिजिटल माध्यमांत प्रचार निषिद्ध.

By Satyajeet News
December 2, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत. १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची मुदत समाप्त होणार असून, त्यानंतर कोणत्याही स्वरूपात प्रचार किंवा प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

त्यानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच समाजमाध्यमांवर कोणतीही प्रचारात्मक जाहिरात प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, संकेतस्थळे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांचा समावेश असून, नियमभंग झाल्यास कारवाई होणार असल्याचे संकेत आयोगाने दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता आपोआप संपुष्टात येईल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, मिरवणुका, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच अन्य कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचार करता येणार नाही.

जाहिरातींवर कडक निर्बंध

राज्य निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणीकरण आदेश, २०२५’ चा हवाला देत, प्रचार समाप्तीनंतर व मतदानाच्या दिवशी जाहिरातींवर संपूर्ण बंदी घातली आहे. या आदेशाच्या भाग ८ मधील परिच्छेद १६ नुसार, प्रचारकालावधी संपल्यानंतर कोणत्याही उमेदवार, पक्ष किंवा समर्थकांच्या वतीने प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत.

सोशल मीडियावरही बारीक नजर

आयोगाने समाजमाध्यमांचाही स्पष्ट उल्लेख केला असून, फेसबुक, व्हॉट्सॲप, एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम यासारख्या डिजिटल व्यासपीठांवरही प्रचारात्मक मजकूर, जाहिराती, व्हिडिओ, पोस्ट किंवा संदेश प्रसारित करण्यास मनाई राहणार आहे. या नियमभंगावर विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही आयोगाने सूचित केले आहे.

निवडणूक यंत्रणेला सूचना

सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, माध्यम प्रमाणन समित्या (MCMC) आणि स्थानिक पोलीस यंत्रणांना या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शांततापूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी हे निर्बंध महत्त्वाचे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, प्रचार थांबवून मतदारांना शांत वातावरणात निर्णय घेता यावा, हाच या आदेशाचा उद्देश असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 21
Previous Article

महायुतीत ‘महाभूकंप’ येणार का? पाचोरा नगरपरिषदेच्या रणधुमाळीत ...

Next Article

लाडकी बहीण योजनेला ‘हिरवा कंदील’ नोव्हेंबर महिन्याचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    आत्मनिर्भर भारत’ हे नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे पाऊल , आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले कौतुक

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    माणुसकी समुहाच्या चौथ्या वर्धापनदिना निमित्ताने राज्यस्तरीय “सेवा गौरव” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

    November 21, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    उठ मराठ्या जागा हो, अन्याया विरोधात तू धागा हो, मराठा बांधवांनो मोठ्या संख्येने आझाद मैदानावर या.

    July 13, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात,राज्यपाल कोश्यारींची विशेष उपस्थिती.

    July 31, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पावसाने हुलकावणी दिल्याने, एका शेतकरी पुत्राने मांडलेल्या व्यथा.

    June 22, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर ,पंचक्रोशीतुन शुभेच्छांचा वर्षाव

    November 21, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पाचोरा येथील लाचखोर कृषी सहाय्यक जळगाव ए.सी.बी.च्या जाळ्यात.

  • पाचोरा तालुका.

    आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आज नागरी सत्कार.

  • क्राईम जगत

    चोरीच्या सात दुचाकींसह तिन संशयित एलसीबीच्या जाळ्यात.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज