सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जळगावात जनजागृतीचा पंधरवडा, १ ते १५ डिसेंबरदरम्यान प्रभातफेरीसह विविध उपक्रमांचे आयोजन.

जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जळगावात जनजागृतीचा पंधरवडा, १ ते १५ डिसेंबरदरम्यान प्रभातफेरीसह विविध उपक्रमांचे आयोजन.

By Satyajeet News
November 30, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

मकरंद कुलकर्णी.(जळगाव)
दिनांक~३०/११/२०२५

समाजात एचआयव्ही/एड्सबाबत जनजागृती होऊन प्रतिबंधात्मक उपायांना चालना मिळावी, या उद्देशाने दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स नियंत्रण दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती तसेच सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन आणि जनजागृती पंधरवड्याच्या प्रारंभानिमित्त प्रभातफेरी व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या माध्यमातून जिल्हा व तालुकास्तरावर व्यापक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये यंदा कौटुंबिक तपासणी तसेच गाव पातळीवर विशेष आरोग्य शिबिरे या योजना नव्याने राबविण्यात येणार असून, एचआयव्ही तपासणी व समुपदेशन सेवांवर विशेष भर दिला जाणार आहे.

या पंधरवड्यात जनजागृतीसाठी रांगोळी, कविता, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, जनजागृती प्रभातफेरी, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ट्रक चालक, वाहक व त्यांच्याशी निगडीत कर्मचारी यांचे विशेष मेळावे, स्थलांतरित कामगारांसाठी जनजागृती कार्यक्रम, भगिनी मेळावे तसेच एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरिता वधू-वर परिचय मेळावे व शासकीय योजनांची माहिती देणारे मेळावेही घेण्यात येणार आहेत.

या सर्व उपक्रमांतून एचआयव्ही/एड्सबाबत समाजातील गैरसमज दूर करणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि बाधित व्यक्तींना सामाजिक आधार देणे हा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जनतेने या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन जागतिक एड्स नियंत्रण दिनाच्या जनजागृती मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 4
Previous Article

“जनता दुधखुळी नाही” : आमदार मंगेश चव्हाण ...

Next Article

न्यायालयीन अपिलांमुळे जळगाव जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांच्या काही ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    योग्य दरात प्लॉट उपलब्ध

    November 16, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोल्हे गावातून शौचालयांची चोरी, हागणदारी मुक्त गाव योजनेचा बोजवारा.

    August 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून, ‘डिझेल अँट युवर डोअर स्टेप’ चा शुभारंभ.

    August 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सावधान जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत ‘हा’ आदेश लागू.

    December 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांचा आगळावेगळा उपक्रम.

    November 28, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघाच्या सुभाष बरडीया यांची निवड

    December 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्रिडा क्षेत्र.

    पाचोरा येथे “आमदार चषक” खुली कबड्डी स्पर्धेस प्रारंभ.

  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे येथील उघड्यावर मांस विक्री करणाऱ्याला ग्रामपंचायतीकडून नोटीस.

  • शुभेच्छा जाहिरात

    आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा शहरात पालकमंत्र्यांची सभा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज