सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›‘चलो सेवाग्राम ते नागपूर’ पायी दारूबंदी पदयात्रा; हिवाळी अधिवेशनावर महिला, युवांचा एल्गार.

‘चलो सेवाग्राम ते नागपूर’ पायी दारूबंदी पदयात्रा; हिवाळी अधिवेशनावर महिला, युवांचा एल्गार.

By Satyajeet News
November 29, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२५

महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी आणि गुटखाबंदी झालीच पाहिजे या ठाम मागणीसाठी सेवाग्राम (वर्धा) येथून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर पायी पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा ६ ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चाच्या प्रमुख मा. सौ. गितांजलीताई कोळी (धुळे) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

पुज्य विनोबा भावे यांच्या सेवाग्राम आश्रमातून आशिर्वाद घेऊन सकाळी १० वाजता या पदयात्रेला सुरुवात होणार असून, महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण असलेल्या नागपूरपर्यंत ही यात्रा चालणार आहे. महिलांचे संसार उद्ध्वस्त करणारी व तरुणाईचे आयुष्य अंधारात लोटणारी दारू व गुटख्याची विक्री थांबवावी, ही या पदयात्रेची मुख्य आणि एकमेव मागणी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या पदयात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला व युवा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यात धुळे, नंदुरबार, अमरावती, पुणे, अकोला, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सध्या सौ. गितांजलीताई कोळी (धुळे), सौ. उषाताई दावळे (नंदुरबार), सौ. उषाताई कोळी (नंदुरबार), श्रीमती मिराताई बागुल (धुळे), सौ. मनिषा पाटील (धुळे), श्रीमती बेबीताई न्हावी (शहादा), श्रीमती सुलभा ठाकूर (धुळे), सौ. माधुरीताई जुमलेवार (पुणे), सौ. मिराताई कोलटक्के (अमरावती), राहुल सोनवणे (धुळे), भगवान कोळी (नंदुरबार), झंका पाटील (अकोला), रामचंद्र घावट (अकोला), रामा पिचकारे (अहिल्यानगर) यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे.

दारूबंदी हा केवळ कायद्याचा विषय नसून तो सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. घराघरात हिंसाचार, आर्थिक दुरवस्था, महिलांवरील अत्याचार आणि तरुणाईचे व्यसनाधीनतेकडे होणारे झुकाव याला दारू जबाबदार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ निषेधात्मक नसून जनजागृतीचेही असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या दारूबंदी पदयात्रेला विरांगणा झलकारीबाई (कोळी) स्त्री शक्ती संस्था, धुळे (नोंदणी क्रमांक महा/१३६८७/धुळे दिनांक १/११/२०१२ व एफ/१२४३५/धुळे दिनांक ५/२/२०१३) यांचे सक्रीय सहकार्य असून, महाराष्ट्रभरातील दारूबंदी समर्थक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.

पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपली नावे नोंदवून स्वेच्छेने प्रती व्यक्ती किमान १०० रुपये आर्थिक मदत करून या जनआंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी सौ. गितांजलीताई कोळी (धुळे) – मोबाईल ९५२७८५०७४२ वर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निघणारी ही पदयात्रा सरकारचे लक्ष वेधून घेणार असून, महाराष्ट्रात दारूबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 16
Previous Article

“खांनदेशाची मुलुख मैदान तोफ पाचोरा शहरात धडकणार; ...

Next Article

भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा दिमाखदार रुट ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्रसांस्कृतिक

    *महासूर्याची ऊर्जायनी- राष्ट्रमाता जिजाऊ* *”मृत्यूकार” विनोद अहिरे यांच्या लेखणीतून*

    January 13, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    आनंद शिंदे महाराष्ट्राचे महागायक,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी दिली ज्येष्ठ विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरच कोर्ट अवमान याचिका दाखल करणार विठ्ठल पवार राजे.

    June 8, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शिर्डी येथील पत्रकारांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्या बाबत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाचोरा येथे निषेध निवेदन

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शेतकरी मित्रहो आपण वेळीच एकत्र आलो नाही तर हे सरकार आपल्या चुलीत मुतल्याशिवाय राहणार नाही. संतोष पाटील.

    March 21, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन , मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुरु असलेल्या सर्व सेवा व गोष्टी पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार

    October 30, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    कोकडी तांडा येथील तरुणाने आर्थिक परिस्थितीला कंटाळून घर सोडले.

  • आरोग्य

    अंबे वडगाव येथे वीटभट्टी मुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. ग्रामसेवक व तलाठी यांचा कानाडोळा.

  • विविध यश निवड

    डॉ. योगिता चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार प्रदान.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज