सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट, राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला सखोल आढावा.

जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट, राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला सखोल आढावा.

By Satyajeet News
November 27, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

मकरंद कुलकर्णी.(जळगाव)
दिनांक~२७/११/२०२५

आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आश्रमशाळांमधील सुविधा व प्रशासकीय कामकाजाचा थेट आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमशाळांचे व्यवस्थापन, विविध शासन योजनांची स्थिती, आर्थिक प्रगती, प्रलंबित नोंदी व प्रशासकीय बाबींची सविस्तर पाहणी करत अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळांतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, बांधकामांची सद्यस्थिती, निधीचा योग्य वापर तसेच कर्मचारी व्यवस्थापन याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच योजनांचा थेट लाभ आदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यानंतर आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावल येथील प्रकल्प कार्यालयातून सहभाग नोंदविला. बैठकीत आश्रमशाळांच्या सुविधा, नवीन व प्रगतिपथावरील बांधकामे, निधी खर्चाची स्थिती, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच ‘धरती आबा जनजातीय गौरव वर्ष’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सखोल समीक्षा करण्यात आली.

ग्राम व तालुका स्तरावर विकास आराखडे तातडीने पूर्ण करून त्यावर आधारित जिल्हास्तरीय आदिवासी विकास आराखड्याची अंमलबजावणी गतीमान करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. आराखड्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा व उपजीविकेच्या संधी यांचा समावेश करून समन्वयाने काम करण्यावर त्यांनी भर दिला.

दरम्यान, संविधान अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनेचे) अनावरण करून उपस्थित अधिकाऱ्यांनी संविधान मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

या प्रसंगी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे आदिवासी विकास योजनांच्या कामकाजाला नवी दिशा व गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 11
Previous Article

भोकरी येथे शिफा क्लिनिक व श्री हॉस्पिटलतर्फे ...

Next Article

भडगाव न्यायालयातील खळबळजनक प्रकरण, निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    रतनलालजी बाफना यांच्या रुपाने सुवर्ण पिंपळपान हरपले – अशोकभाऊ जैन

    November 17, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील ध्येय न्यूजचे संपादक मा.श्री. संदीप महाजन कोरोना पॉझिटिव्ह.

    March 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी बाजारात मिरचीचा ठसका, सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी.

    April 16, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रमेशचंद्रजी बाफना यांनी परोपकाराची भावना जपत केला वाढदिवस साजरा.

    August 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार,रस्त्यापेक्षा उंच गटार.

    September 3, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मोहाडी येथील महिला रूग्णालयात कोविडच्या रूग्णांसाठी अद्ययावत सेवा मिळणार.पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश.

    March 30, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील ध्येय न्यूजचे संपादक मा.श्री. संदीप महाजन कोरोना पॉझिटिव्ह.

  • ब्रेकिंग न्यूज

    तारखेडा खुर्द गावात गौण खनिज माफियांचा धिंगाणा, सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज