सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जळगाव जिल्हा दौरा मुक्ताईनगर, भडगाव व पाचोरा येथे जाहीर सभा.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जळगाव जिल्हा दौरा मुक्ताईनगर, भडगाव व पाचोरा येथे जाहीर सभा.

By Satyajeet News
November 26, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२५

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचा आज २७ नोव्हेंबर २०२५ गुरुवार रोजी जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (राजशिष्टाचार कक्ष) यांच्यामार्फत हा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कार्यक्रमानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी १०.३० वाजता मुंबई/ठाणे येथील निवासस्थानावरून मोटारीने मुंबई विमानतळाकडे रवाना होतील. सकाळी ११.०० वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने ते तळोदा, जिल्हा नंदुरबारकडे रवाना होतील.

त्यानंतर दुपारी २.०० वाजता भारत मिल कंपाऊंड हेलिपॅड, नंदुरबार येथे आगमन होईल. येथून ते हेलिकॉप्टरने मुक्ताईनगरकडे प्रयाण करतील. दुपारी २.४५ वाजता संत मुक्ताबाई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज हेलिपॅड, मुक्ताईनगर येथे आगमन होऊन मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे रवाना होतील.

दुपारी ३.०० वाजता मुक्ताईनगर येथे पहिली जाहीर सभा पार पडणार असून, ही सभा जे.डी.सी.सी. बँक चौक, भुसावळ रोड, मुक्ताईनगर येथे होणार आहे. या सभेचे संदर्भ आमदार श्री. चंद्रकांत पाटील व शिवसेना सचिव श्री. संजय मोरे यांचे आहेत.

यानंतर दुपारी ३.३० वाजता उपमुख्यमंत्री मोटारीने पुन्हा कॉलेज हेलिपॅडकडे रवाना होतील. दुपारी ३.३५ वाजता ते हेलिकॉप्टरने भडगावकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४.१० वाजता भडगाव क्रीडा संकुल मैदान हेलिपॅड येथे आगमनानंतर मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे जातील.

सायंकाळी ४.१५ वाजता भडगाव येथे दुसरी जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, ती आकाश मॉल जवळ, पारोळा रोड, भडगाव येथे होणार आहे. या सभेचे संदर्भ आमदार श्री. किशोर पाटील व शिवसेना सचिव श्री. संजय मोरे यांचे आहेत.

यानंतर उपमुख्यमंत्री सायंकाळी ४.३५ वाजता पाचोऱ्याकडे मोटारीने रवाना होतील. सायंकाळी ५.०० वाजता पाचोरा येथे तिसरी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. ही सभा छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे होईल. या सभेचेही संदर्भ आमदार श्री. किशोर पाटील व शिवसेना सचिव श्री. संजय मोरे यांचे आहेत.

सभा आटोपल्यानंतर सायंकाळी ५.२० वाजता उपमुख्यमंत्री भडगाव येथील क्रीडा संकुल हेलिपॅडकडे मोटारीने रवाना होतील. सायंकाळी ५.३० वाजता तेथे आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण होईल. सायंकाळी ५.५० वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानाने शिर्डी विमानतळाकडे रवाना होणार असल्याचे राजशिष्टाचार विभागाने कळविले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे मुक्ताईनगर, भडगाव व पाचोरा येथे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, त्यांच्या जाहीर सभांकडे कार्यकर्ते व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 114
Previous Article

जळगाव विमानतळ विस्तारासाठी भूसंपादनाला गती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ...

Next Article

सत्तेत महायुती, मात्र पाचोऱ्यात थेट लढत, भाजप ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील नांद्रा ग्रामस्थांच्या समस्यां सोडवण्यासाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा.

    July 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दिव्यांग गणेश कुमारचे जनजागृतीचे कार्य प्रेरणादायी, पालकमंत्री गुलाबराव पाटील.

    July 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यातील अकराशे साठ ग्रामपंचायतीमध्ये, आजपासून पंचायत राज.

    September 16, 2025
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निधन वार्ता कै. अर्जुन मराठे.

    February 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदूर्णी येथे युवासेनेच्या वतीने फळे वाटप.

    June 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा अन्यथा उपोषणाचा इशारा

    November 7, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedआरोग्य

    जागतिक हात धुवा दिन १५ ऑक्टोबर,२०२१ उपक्रमांचा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.

  • सामाजिक उपक्रम.

    मेहताब सिंग राठोड यांना बंजारा भुषण पुरस्कार प्रदान.

  • पाचोरा तालुका.

    रोटरी क्लब पाचोरा, भडगावचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज