सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›मतदारांचा विसर व आश्वासनांची मोडतोड : लोकशाहीचा खरा अर्थ हरवतोय का ? सुज्ञ नागरिकांचा संतप्त सवाल.

मतदारांचा विसर व आश्वासनांची मोडतोड : लोकशाहीचा खरा अर्थ हरवतोय का ? सुज्ञ नागरिकांचा संतप्त सवाल.

By Satyajeet News
November 24, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२५

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की उमेदवारांची मतदारांच्या दारी धावपळ सुरू होते. साक्षात दंडवत घालण्यापासून ते नको-नको ती आश्वासने देण्यापर्यंत सर्व तोडगे योजले जातात. पण निवडणूक संपताच उमेदवारांचा स्वरूप पालटतो, अशी टीका सुज्ञ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.

मतदारांच्या घरी जाऊन हात जोडणारे, विकासाचे पर्व येईल अशा आश्वासनांचा वर्षाव करणारे, मतदानाची विनंती करणारे हेच उमेदवार निवडून आल्यानंतर मतदारांकडे पाठ फिरवतात, अशी खंत नागरिकांनी वर्तवली. अनेकांनी दिलेल्या आश्वासनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते; विकासकामांचा विसर पडतो; मतदार मात्र पूर्वस्थितीतच जगत राहतात. “हीच का खरी लोकशाही?” असा सवाल सर्रास विचारला जात आहे.

दर निवडणुकीत हा तमाशा बदलत नाही. मतदारांना खुश करण्यासाठी ओल्या पार्ट्यांचा पाऊस, पैशांचे वाटप, मनधरणीचे प्रकार तर कुठे दडपशाही यांचे सत्र काही नवीन नाही. सत्तेचा हेवा असलेली राजकारणाची ही चढाओढ लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर गदा आणणारी असल्याची भावना नागरिकांनी स्पष्टपणे मांडली आहे.

निवडणूक जिंकणाऱ्या नेत्यांची मालमत्ता काही वर्षांतच कोट्यवधींनी वाढताना दिसते; परंतु ज्यांच्या मतदानावर ते निवडून येतात त्या सर्वसामान्य मतदारांना मात्र सरकारी योजनांसाठी, शिध्याच्या धान्यासाठी, अत्यावश्यक सुविधांसाठी भिकाऱ्यासारखे भटकावे लागते, ही कटू वस्तुस्थिती असल्याचे मत व्यक्त होत आहे.

जनतेच्या अपेक्षा, मूलभूत गरजा, विकासाची दिशा व राजकीय उत्तरदायित्व यातील वाढता दुरावा हा चिंतेचा विषय ठरत आहे. निवडणूक आली की वचनांचा पाऊस आणि निवडणूक गेली की त्यांची विस्मृती— या चक्रातून मुक्त होण्यासाठी सुज्ञ मतदारांनी स्वतः जागरूक राहून जबाबदार नेतृत्व उभे करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 3
Previous Article

डांभुर्णी मातामाई यात्रेला रंगतदार सुरुवात धार्मिक, सांस्कृतिक ...

Next Article

पाचोरा नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे व्यापारी बांधवांसोबत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    जळगाव पोलीस कराटे व स्केटींग क्लब मधील सर्व खेळाडूंचा कौतुक व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

    February 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड खुर्द येथील अनिल चौधरी यांचे अपघती निधन.

    July 21, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    सिल्लोड शहरात व सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात नागरीकांनी सर्तक राहाण्याचे पोलीसांनी केले आव्हान.

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरात बंद घर फोडुन ऐवज लांबवला , गुन्हा दाखल.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गुमनाम है कोई, बदनाम है कोई , परेशान है पोलिस भाई.

    August 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    प.पू.प.म.आचार्य प्रवर श्रीयेळमकर नवे बाबाजी यांच्या महंती वर्षपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..

    March 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    अंबे वडगाव पंचक्रोशीतील अवैधधंदे बंद झाल्याने उपोषण मागे.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • आपलं जळगाव

    संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज