पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत उत्साह उसळला १६ नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी तब्बल ४८ उमेदवारी अर्ज दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२५
पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांच्या रांगा दिवसेंदिवस वाढत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे यांच्या समोर गुरुवारी (१६ नोव्हेंबर) नगरसेवक पदासाठी आणखी ४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. याआधी दाखल झालेल्या ४६ अर्जांसह एकूण अर्जांची संख्या ९४ वर पोहोचली आहे. वाढत्या उमेदवारींमुळे स्थानिक राजकारणात जोरदार चढाओढ रंगताना दिसत आहे.
प्रत्येक प्रभागात शिवसेना, भाजपा, अपक्ष तसेच शिवसेना (उबाठा) यांच्या वतीने मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज दाखल केले. काही प्रभागात एकाच पक्षातील अनेक दावेदारांनी अर्ज दाखल केल्याने अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. यामुळे पुढील छाननी, अर्ज मागे घेणे आणि अंतिम यादीनंतर राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.
प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज, कोण कुठून रिंगणात ?
प्रभाग १ (अ)
निकम वैशाली जगन्नाथ (शिवसेना)
पारोचे मंदाकिनी नीलेश (शिवसेना)
सोनवणे मेघना रामकृष्ण (शिवसेना उबाठा)
सोनवणे प्रीती विनोद (शिवसेना)
प्रभाग २ (अ/ब)
बागूल अनंत विठ्ठल (अपक्ष, शिवसेना उबाठा)
फकिर शमीनाबी साबीर शहा (अपक्ष)
चौधरी वैशाली छोटूलाल (शिवसेना)
प्रभाग ३ (अ/ब)
पाटील मनीषा महेश (शिवसेना/अपक्ष)
पाटील कविता विनोद (भाजपा)
प्रशांत रामदास पाटील (शिवसेना उबाठा)
अविनाश देविदास सुतार (अपक्ष)
प्रभाग ४ (अ/ब)
बागवान हाजराबी यासीन (शिवसेना)
बागवान सलमान यासीन (शिवसेना/अपक्ष)
बागवान मुजफ्फर शकूर (अपक्ष)
शेख नसीम बी. खलील (शिवसेना)
शेख शबाना सईद (शिवसेना)
सैय्यद परवीन से. दानीश (अपक्ष)
प्रभाग ५ (अ)
महाजन सुरेखा संजय (शिवसेना)
प्रभाग ६ (अ/ब)
सोनवणे दीपक प्रकाश (भाजपा/अपक्ष)
सावंत सुनीता अनिल (शिवसेना उबाठा)
चौधरी मनीषा धर्मेंद्र (भाजपा)
प्रभाग ७ (अ/ब)
केदार माया दगा (शिवसेना)
भालेराव नम्रता प्रमोद (भाजपा)
शिंदे सतीश परशराम (भाजपा)
प्रभाग ८ (अ/ब)
एरंडे मिनाक्षी संजय (शिवसेना)
मोरे बंडू अशोक (शिवसेना उबाठा)
पाटील गणेश भीमराव (शिवसेना)
प्रभाग १० (अ/ब)
पाटील योगेश जगन्नाथ (शिवसेना)
भोसले जयश्री अमृतराव (शिवसेना)
प्रभाग ११ (अ/ब)
देशमुख रखशंदा नवीद (शिवसेना)
शिंदे सिंधू पंडित (भाजपा)
देशमुख अमरीन अब्दुल रहेमान (भाजपा)
देशमुख अनिस आलम चांदपाशा (शिवसेना)
देशमुख अब्दुल रहेमान (भाजपा)
बागवान वाजीद बशीर (भाजपा)
जाधव मच्छीद्र शिवाजी (शिवसेना)
प्रभाग १२ (अ/ब)
पाटील प्रियंका वाल्मिक (शिवसेना)
पाटील शिवानी अनिल (शिवसेना)
पाटील सरला ओमप्रकाश (भाजपा)
पाटील वाल्मिक रमेश (शिवसेना)
पाटील संदीप रामदास (शिवसेना)
येवले अनिल कलिदास (अपक्ष)
प्रभाग १४ (अ/ब)
वाघ प्रदीप भगवान (शिवसेना)
पाटील सुरेश अशोक (शिवसेना)
राजकीय तापमानात वाढ
उमेदवारी अर्जांच्या वाढत्या संख्येमुळे पाचोऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षनिष्ठा, स्थानिक समीकरणे, जाती-जमातींचे गणित, तरुण नेतृत्वाचा सहभाग आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल करण्याचा कल — या सर्व गोष्टींमुळे आगामी निवडणूक चुरशीची ठरणार यात शंका नाही.
येत्या काही दिवसांत छाननी, अर्ज मागे घेणे आणि चिन्ह वाटपानंतर सर्वच पक्षांकडून प्रचाराचा बिगुल फुंकला जाईल. नागरिकांसाठी मात्र या लढतीचे स्वरूप कोणत्या दिशेने वळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.