सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›निवडणूक प्रक्रियेला गती, नामांकनासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइनचीही सुविधा. राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय.

निवडणूक प्रक्रियेला गती, नामांकनासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइनचीही सुविधा. राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय.

By Satyajeet News
November 14, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२५

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना संगणक प्रणालीमध्ये उद्भवलेल्या अडचणींना लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही नामांकन पत्र स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयोगाचे याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले. निवडणूक कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यापासून नामांकन प्रक्रिया केवळ ऑनलाईन पद्धतीने सुरू होती. मात्र, मागील काही दिवसांपासून संगणक प्रणालीवर तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याची माहिती आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
=========================================================
रविवारीही नामांकन दाखल करता येणार.
=========================================================
निर्देशांनुसार १५, १६ आणि १७ नोव्हेंबर—तीन्ही दिवस, रविवार १६ नोव्हेंबर हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला तरीही, उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. यामध्ये ऑनलाईनसोबतच पारंपारिक ऑफलाईन पद्धतीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी (RO) यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. संगणक प्रणालीवर वाढत्या भारामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारांची अडचण होऊ नये आणि सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी, हा आयोगाचा उद्देश असल्याचे पत्रात म्हटले आहे.
=========================================================
जिल्हाधिकाऱ्यांना सूचना प्रसारित करण्याचे आदेश.
=========================================================
राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून तातडीने सूचना जारी करून ही माहिती सर्व उमेदवार, पक्ष आणि मतदान क्षेत्रांपर्यंत पोहोचवावी, असेही निर्देश देण्यात आले असून परिपत्रकाची प्रत सर्व विभागीय आयुक्त, मुख्याधिकारी, संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत जिल्हा पोलीस अधीक्षक, आयुक्त, यांच्याकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली असून राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार हे पत्र सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केले.

यामुळे निवडणूक प्रक्रियेला गती, नामांकनासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइनचीही सुविधा. राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णयामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 159
Previous Article

पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा उच्छाद कायम; भोकरीत ...

Next Article

पाचोरा तालुक्यात बी. एच. एम. एस. डॉक्टरांकडून ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

    December 5, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री, सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ.

    October 6, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    मालखेडा गावाजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली, घातपात झाला असल्याचा मयताच्या नातेवाईकांचा संशय.

    October 16, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    आम्ही मारल्यासारखे करु, तुम्ही रडल्यासारखे करा. वरखेडी येथील राज ढाब्यावर दारुबंदी अधिकाऱ्याचा छुपा आर्शिवाद,

    September 15, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    वाकोद येथून घरातून निघून गेली आहे.

    October 27, 2022
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    सिल्लोड तालुक्यात अनाधिकृत कत्तलखाने असल्याने, गुरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा संशय.

    September 16, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    अंगणात खेळत होता कान्हा, हेतुपुरस्सर दाखल करण्यात आला खोटा गुन्हा.

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव येथे लम्पी आजाराने बैल दगावला.

  • कृषी विषयक

    अमोल भाऊ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा दसरा गोड.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज