सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

By Satyajeet News
November 8, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२५

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच पाचोरा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी असोत वा विरोधक, दोन्ही गटांतील नेते, आपापल्या पक्षाची बळकटी वाढवण्यासाठी आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पळवापळवीत गुंतलेले दिसत आहेत. मात्र, या राजकीय गदारोळाचा फायदा घेत काही अवैध धंदे करणारे व भ्रष्ट ठेकेदार आता राजकीय आसरा शोधू लागल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. तसेच बऱ्याच वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हेही पडद्यामागुन मर्जीतील लोकांची पाठराखण करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सट्टा, पत्ता, जुगार, अवैध दारू निर्मिती व विक्री, धान्याचा काळाबाजार, वाळू व गौण खनिजांची चोरी, अनधिकृत शिक्षण संस्था व शिक्षक भरतीतील गडबड, शासकीय भूखंडावरील तसेच गायरान, गावठाण जमीन घोटाळा, अशा अनेक गैरप्रकारांमध्ये गुंतलेले लोक आता विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यातून त्यांना एकप्रकारे सुरक्षाकवच मिळत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

यातच भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घालणारे आणि अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयात ठाण मांडून बसलेले काही अधिकारी व कर्मचारी सुरक्षाकवच मिळवून घेण्यासाठी हे देखील आपल्या स्वार्थासाठी पडद्यामागुन राजकारणात सक्रीय झाले आहेत. या ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी गठबंधनामुळे विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, दर्जाहीन बांधकामे आणि निधीचा अपव्यय होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

सुज्ञ नागरिकांनी या सर्व घडामोडींविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राजकारण हे समाजसेवेसाठी असावं, पण आता काहींच्या हातात ते वैयक्तिक फायद्याचं साधन बनलं आहे. प्रामाणिक, निष्ठावंत आणि समाजाभिमुख लोक राजकारणापासून दूर जात आहेत, हीच खरी शोकांतिका आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, सत्तेच्या राजकारणात काम, दाम, दंड, भेद या नीतींचा वापर करून सत्ता मिळवली जाते, पण नंतर सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले जाते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. याच राजकीय स्वार्थामुळे समाजात असंतोष वाढत असून, खून, दरोडे, चोरी, वाळू तस्करी आणि अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशांतता निर्माण होत आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे अल्पवयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत ओढली जात आहे. “समाजातील अधोगती थांबवायची असेल तर राजकीय नेत्यांनी स्वच्छ राजकारणाचा आदर्श निर्माण करावा आणि अवैध धंदे, भ्रष्टाचार व गुन्हेगारीला राजकीय छत्रछाया देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी ठाम मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 159
Previous Article

भोकरीतील मुस्लिम युवकांचा आमदार किशोर “आप्पा” पाटील ...

Next Article

जामनेर नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर! १७ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    भडगाव : साईनगर बुथवर शिक्षकांचा ‘ताफा’, मतदान प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप; चौकशीची मागणी.

    December 3, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात अवैध दारु विक्रेते जोमात तर अधिकृत दारु विक्रेते कोमात. भरारी पथकाच्या निरीक्षकाचा मनमानी कारभार.

    May 23, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा व जामनेर तालुक्यातील धर्मस्थळांवर बुवाबाजीला ऊत, भोळ्याभाबड्या जनतेच्या भावनांशी खेळ. अंधश्रद्धा निर्मूलन समित्या नावालाच.

    July 3, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना मनोज जरांगे पाटलांची मूकसंमती.

    November 4, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास वडगाव आंबे येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात.

    September 11, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव शेत शिवारात बिबट्याचे दर्शन, वरखेडी, लोहारी परिसरात माकडाचा हैदोस.

    October 11, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वन बूथ टेन युथ सशक्तिकरण संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

  • राजकीय

    वरखेडी ते कुऱ्हाड रस्त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न आमदार गिरीश महाजनांचेच (जगदीश तेली कुऱ्हाड)

  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड गावात भरवस्तीत सार्वजनिक जागेवर, विनापरवानगी विहीरीचे खोदकामाला ग्रामस्थांचा विरोध.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज