सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पाचोरा गुन्हे शोध पथकाची चार तासांत मोठी कामगिरी : चोरी गेलेली मोटारसायकल जप्त, आरोपी अटकेत.

पाचोरा गुन्हे शोध पथकाची चार तासांत मोठी कामगिरी : चोरी गेलेली मोटारसायकल जप्त, आरोपी अटकेत.

By Satyajeet News
November 7, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२५

पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ चार तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीस जेरबंद करून चोरी गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढवण्यासाठी ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास फिर्यादी मनोज डिगंबर जाधव (वय ३०, व्यवसाय – मेडिकल, रा. भोजे चिंचपुरे, ता. पाचोरा) यांनी जारगाव चौफुली येथे त्यांची बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॅटीना मोटारसायकल (क्रमांक MH-19 CP-0869) पार्क केली होती. दरम्यान, फळ घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय मोटारसायकल लंपास केली. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ५१२/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल. राहुल काशिनाथ शिंपी, योगेश सुरेश पाटील, शरद मांगो पाटील, गणेश प्रल्हाद कुवर व श्रीराम अनिल शिंपी यांनी तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत कृष्णपुरी परिसरात संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तत्काळ कारवाई केली.

सदर ठिकाणी दबा धरून बसलेल्या पथकाने संशयित इसमास पकडले. चौकशीअंती त्याने स्वतःचे नाव भगवान लक्ष्मण पाटील (वय ३५, रा. पिंप्री खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेली अंदाजे ४५ हजार रुपयांची बजाज प्लॅटीना मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

चार तासांत आरोपीला गजाआड गुन्हे शोध पथकाच्या वेगवान तपासामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 125
Previous Article

पाचोरा तालुक्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी ...

Next Article

शेंदुर्णीत भाजपा कार्यकर्त्यांची आज महत्त्वाची बैठक.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedक्राईम जगत

    जनरेटर चोरी प्रकरणी दोघे अटकेत; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शेंदुर्णीसह परिसरातील गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा.

    July 30, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या विरोधात शासकीय कर्मच्याऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल.

    September 1, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथुन दुचाकीची चोरी.

    December 19, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची वॉश आऊट मोहीम, अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले.

    April 5, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वडगाव कडे येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल.

    August 13, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    जामनेर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पो. स्टेशनची मोठी कारवाई हात भट्टया नेस्तनाबूत.

  • राजकीय

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पाचोरा शहर शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने साधेपणाने साजरा .

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज