पाचोरा येथील जैन पाठशाळेत २९ जून रोजी सायबर क्राईम विषयावर व्याख्यान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०६/२०२५
प्रगत युगात सद्यस्थितीत दैनंदिन व्यवहारात सगळीकडे संगणक, इंटरनेट, भ्रमणध्वनी, इतर डिजिटल उपकरणांचा वापर केला जात आहे तसेच संगणक व भ्रमणध्वनीवर वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली यातून होत असलेले आर्थिक व इतर व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचाच फायदा घेत काही लोक सायबर गुन्हा म्हणजे फसवणूक, हॅकिंग, ओळख चोरी, रॅन्समवेअर हल्ले आणि मालवेअर हल्ल्यासारखे प्रकार घडून भल्याभल्यांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत याच सायबर क्राईम गुन्ह्यात भल्याभल्यांची फसवणूक केली जात आहे.

ही फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे याबाबत जनजागृती करण्यासाठी पाचोरा, भडगाव रोटरी क्लबच्या माध्यमातून तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अशोक पवार यांच्या विशेष सहकार्याने रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे व जैन पाठशाळेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. प्रफुल्ल भाऊ संघवी यांच्यातर्फे दिनांक २९ जून २०२५ रविवार रोजी सकाळी दहा वाजता पाचोरा येथील जामनेर रोड वरील जैन पाठशाळेच्या सभागृहात “सायबर क्राईम” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सायबर क्राईम विषयावर बोलण्यासाठी पुणे येथील सुप्रसिध्द, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सायबर सेक्युरेटी व्याख्याने डॉ. धनंजय देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभणार असून हे सायबर सेक्युरिटीच्या संदर्भात महत्वाचे नियम, कायदे यावर उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करणार असून दैनंदिन जीवनात संगणक, भ्रमणध्वनी व इतर डिजिटल उपकरणांचा वापर करतांना काय व कशी खबरदारी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी पाचोरा तालुक्यातील व शहरातील व्यापारी, उद्योजक, युवक, युवती तसेच बॅंकिंग क्षेत्राशी निगडीत संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले असून व्याख्यानानंतर उपस्थित श्रोत्यांच्या शंका व प्रश्नांचे समाधान डॉ. धनंजय देशपांडे करणार आहेत. सदर व्याख्यान व मार्गदर्शन हे सर्वांसाठी निशुल्क खुले ठेवण्यात आले असल्याने जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



