सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२५
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथून जवळच असलेल्या आर्वे शिवारातील महाराष्ट्र राज्य सरकारच्या मालकीच्या गट नंबर २७ या जमिनीवर तुळजाई शिक्षण मंडळ पाचोराचे दिलीप मुकुंदराव पाटील यांनी शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता आदिवासी मुलांच्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. ही बाब जनतेच्या आलेल्या शेकडो तक्रारींची दखल घेऊन सत्यजित न्यूजच्या माध्यमातून उघड करण्यात आली होती व हे बांधकाम त्वरित थांबण्याची मागणी करण्यात आली होती.
या सर्वसामान्य जनतेच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित होताच लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामविस्तार अधिकारी जी. के. नन्नवरे यांनी दिनांक १७ जून २०२५ मंगळवार रोजी तुळजाई शिक्षण संस्थेचे दिलीप मुकुंदराव पाटील याना पोस्टाद्वारे लेखी नोटीस बजावली असून हे अनाधिकृतपणे केले जाणारे बांधकाम त्वरित बंद करावे असे आदेशीत केले असून नोटीस मिळाल्यानंतरही बांधकाम सुरु असल्याचे आढळून आल्यास तुमच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी असे पाठवण्यात आलेल्या नोटीस मध्ये नमूद केले आहे.
**************************************************
तुळजाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप मुकुंदराव पाटील मंत्रालयात ठाण मांडून.
**************************************************
लोहारी येथून जवळच असलेल्या आर्वे शिवारातील महाराष्ट्र राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनीवर तुळजाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप मुकुंदराव पाटील यांनी कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता आदिवासी या भावनीक शब्दाचा आधार घेऊन बांधकाम सुरु केले असून या गैरप्रकाराबाबत जनतेतून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वृत्तांकन केले होते. याची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी यांनी नोटीस बजावणार दिलीप मुकुंदराव पाटील यांनी मुंबई गाठून ही जागा बळकावण्यासाठी मंत्रीमंडळातील काही जवळच्या मंत्र्यांसमोर उठाबशा काढायला सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक वृत्त असले तरी संबंधित मंत्री महोदयांनी दिलीप मुकुंदराव पाटील यांना सहकार्य करण्यासाठी स्पष्ट नकार दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे या शासनाच्या भुखंडाचे श्रीखंड खाऊन त्याठिकाणी आदिवासी शाळा उभारुन पैसे छापण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दिलीप मुकुंदराव पाटील यांना कुणीही पाठीशी घालु नये अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली असून जर या जागेवर शाळेचे बांधकाम करण्यात आले तर तिव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा सुज्ञ नागरिकांनी दिला आहे.