शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२५
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील दिलीप जैन यांच्या घराजवळील एक महिलेच्या घरासमोर बांधण्यात आलेल्या शौचालयाचा शोषखड्डा ट्रॅक्टरचे चाक गेल्यामुळे मागील एक महिन्यांपासून फुटला असल्याने तसेच आता पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने या शोषखड्ड्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्या परिसरात रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अंबे वडगाव येथील सरपंच बबलू तडवी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन वारंवार कल्पना देऊन हा खड्डा दुरुस्त करण्यात यावा किंवा योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली परंतु सरपंचांनी येतो, बघतो, करतो अशी आश्वासने देऊन आजपर्यंत कोणत्याही प्रकारची तरतूद केली नसल्याने आता हि समस्या सोडविण्यासाठी मा. गटविकास अधिकारी व संबंधित आरोग्य विभागाकडे रितसर तक्रार दाखल करणार आहे.
क्रमशः
पुढील भागात गावठी डुकरांचा उपद्रव या विषयावर सविस्तर बातमी.