गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०६/२०२५
पाचोरा पोलीसांनी दिनांक १३ जून २०२५ शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नाकाबंदी दरम्यान पाचोरा शहरातील भडगाव रोडवर असलेल्या एम. एम. समोर भडगाव शहराकडून पाचोरा शहराकडे येणारे महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच. ०३, सी. पी. २४९७ या वाहनास अडवून झाडाझडती घेतली असता त्या वाहनात १५ पोते आढळून आल्यावर वाहनचालकाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोत्यांची तपासणी केली असता त्या पोत्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आढळून आल्यामुळे गुटखा वाहून नेणाऱ्या चालक संशयित आरोपी अशोक रमेश भिल वय वर्षे २५ राहणार हेकंवाडी तालुका, जिल्हा धुळे याच्यासह गुटख्याने भरलेले वाहन पाचोरा पोलीस स्टेशनला आणून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर गाडी चालक संशयित आरोपीला काल दिनांक १४ जून २०२५ शनिवार रोजी मा. पाचोरा न्यायालयात हजर केले असता पुढील तपासकामी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
संशयित वाहनचालकाला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सत्यजित न्यूजच्या माध्यमातून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली होती ती खरी ठरली आहे. कारण पाचोरा पोलीसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता इमानेइतबारे कसुन चौकशी केली असता चौकशीअंती मुख्य आरोपीचे नाव समोर आले असून चालकाने सांगितल्याप्रमाणे मी फक्त या गाडीवर चालक म्हणून कामाला आहे व याचा मुळ मालक हा धुळ्याजवळील नंदाळे बुद्रुक येथील एकनाथ मच्छिंद्र पाटील हा असल्याचे सांगितले व त्याच्या सांगण्यावरुन मी हा गुटखा घेऊन निघालो होतो अशी माहिती दिली असल्याने पाचोरा पोलीसांना या तपासात मोठे यश प्राप्त झाले असून या गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ मच्छिंद्र पाटील नंदाळे बुद्रुक याचा पाचोरा पोलीस कसुन शोध घेत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता या गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ मच्छिंद्र पाटील हा पोलीसांच्या हाती आल्यावर त्याने हा गुटखा कुणाच्या सांगण्यावरुन पाचोरा शहराकडे आणला होता, या गुटखा घेणारा कोण व हा गुटखा कुठेकुठे वाटप करण्यात येणार होता, याबाबत सविस्तर माहिती समोर आल्यावर अजून काही गुटखा किंग पाचोरा पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात असून या धडक कारवाईमुळे जनमानसातून पाचोरा पलीसांचे कौतुक केले जात असून सध्यातरी पाचोरा तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.