पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२५
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या पिंप्री येथे नांदोळ नदीवर बांधण्यात आलेल्या धरणावर सोयगाव तालुक्यातील एका गावातील व जामनेर तालुक्यातील एका गावातील इसमाने एक महिलेच्या माध्यमातून अनाधिकृतपणे ताबा घेऊन या धरणातून गाळ व माती उचल करणारे शेतकरी व विट भट्टीचा व्यवसाय करणारांची अडवणूक करुन त्यांच्याकडून प्रती ट्रॅक्टर दोनशे ते तीनशे रुपये सक्तीने वसूल करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून जो कुणी पैसे देणार नाही त्याला गाळ व माती भरु देत नाहीत व जर कुणी गाळ किंवा माती उत्खनन करुन वाहुन नेण्यासाठी प्रयत्न केला तर त्याच्याशी हमरीतुमरीवर येऊन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या गैरप्रकारामुळे शेतकरीवर्ग व विट भट्टी व्यावसायीक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

Road construction machinery on the construction of highway S6, Goleniów, Poland
परंतु पिंप्री धरणावर संबंधित लोकांनी अनाधिकृतपणे ताबा घेतला असल्याने एका बाजूला पिंप्री धरणाचे खोलीकरणाचे काम थांबले असल्याने शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असून धरणातून गाळ व माती उत्खनन व उचल न झाल्यास पाण्याची पातळी कमी होऊन पावसाचे पाणी वाहून जाणार असल्याने पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना विफल ठरणार असून दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकुन शेतजमीन सुपीक करण्यात तसेच विट भट्टी वाल्यांना माती उपलब्ध होत नसल्याने त्याचा व्यवसाय डबघाईस आला आहे.
म्हणून या अनाधिकृतपणे धरणावर ताबा घेऊन शुध्द दादागिरी करणाऱ्या सोयगाव तालुक्यातील एका गावातील व जामनेर तालुक्यातील एका गावातील दोन व्यक्ती व संबंधित महिलेवर कायदेशीर पायबंद घालण्यासाठी पाटबंधारे विभागाने रितसर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कारण या त्रिकुटाने महिलेच्या मदतीने माती उत्खनन व उचल करणाऱ्या एका जे. सी. बी. मालकाने त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.




