पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२५
दि. पाचोरा पिपल्स को, ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा या बॅंकेचे आपली हक्काची बॅंक दि. पाचोरा पिपल्स को. ऑपरेटिव्ह बॅंक हे ब्रीद वाक्य आहे मात्र याच बॅंकेच्या भोंगळ कारभाराचा इरसाल नमुना समोर आला असून या बॅंकेकडून इस्माईल कडू पिंजारी यांनी त्यांच्या मालकीचे घर सिटी सर्व्हे नंबर २९१ क्षेत्र ३३.४ या घरावर सन १९६४ सालात फक्त आणि फक्त पाचशे रुपये कर्ज घेतले होते व या कर्जाच्या घेतलेल्या रकमेची परतफेड इस्माईल कडू पिंजारी यांनी त्यांच्या हयातीत केलेली आहे व घेतलेल्या कर्जाची परतफेड केली असल्याची निल पावती (दाखला) आजच्या घडीला मयत इस्माईल कडू पिंजारी यांचा आजचा वारसदार पुतण्या मुस्ताक मन्सूर पिंजारी यांचेकडे आहे.
याबाबत मुस्ताक पिंजारी यांनी दिलेली माहिती अशी की मुस्ताक पिंजारी हे कर्जफेडीचा दाखला घेऊन मुस्ताक पिंजारी यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक पाचोरा भाग दोन यांच्याकडे सदर घरावरील बोजा कमी करण्यासाठी अर्ज दिला होता. हा अर्ज स्विकारल्यानंतर सहाय्यक दुय्यम निबंधक साहेबांनी दप्तर तपासणी करत सांगितले की सदरील घर जागा ही दि. पाचोरा पिपल्स को. ऑपरेटिव्ह बॅंकेने सन २०१६ मध्ये महेमुद मन्सूर पिंजारी यांना विकली असल्याचे सांगितले. हे उत्तर ऐकून मुस्ताक पिंजारी यांच्या पायाखालची वाळू सरकली व त्यांनी पुन्हा दि. पाचोरा पिपल्स बॅंकेकत जाऊन विचारपूस केली मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने मुस्ताक पिंजारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित मुळ घरमालक यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली असतांनाही दि. पाचोरा पिपल्स बॅंकेने संबंधित मुळ घरमालक किंवा त्याच्या वारसदारांना कोणत्याही प्रकारची सुचना न देता घराची परस्पर विक्री केली असल्याने या बॅंकेचे व्यवस्थापक, संचालक मंडळ, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात आमची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन आम्हाला आमचे घर परत मिळवून द्यावे अशी तक्रार दिनांक १५ मे २०२५ रोजी मुस्ताक पिंजारी यांनी जिल्हा उपनिरीक्षक सहकारी संस्था जळगाव यांच्याकडे केली आहे.
आजच्या घडीला मुस्ताक पिंजारी यांनी काही कागदपत्र व पुराव्यानिशी प्रसारमाध्यमांना माहिती देत त्यांचे म्हणणे मांडले असले तरी दि. पाचोरा पिपल्स बॅंकेच्या माध्यमातून खरा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.







