पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०५/२०२५
भविष्यात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन सगळीकडे आपल्या पक्षाच्या बळकटीकरणासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरु असून हा राजकारणाचा ज्वर आता दिल्लीपासून तर थेट गल्लीबोळापर्यंत येऊन ठेपला असून ही राजकीय रस्सीखेच सुरु झाल्याने दिल्लीपासून तर थेट गल्लीबोळापर्यंत वेगवेगळ्या पक्षाचे गटतट तयार झाले असून गटातटाच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे.
अशाच राजकीय पक्षाच्या चढाओढीच्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाचे कार्यकर्ते ईश्वर भगाजी शेलार व शिवसेना शिंदे गटाचे राकेश जग्गू वाघे यांच्यात पक्षाचे कामकाज करण्यावरुन शाब्दिक चकमक होऊन याचे रुपांतर हाणामारीत झाले व या हाणामारीत बेसावध असलेले स्वराज पक्षाचे कार्यकर्ते ईश्वर शेलार यांच्यावर राकेश वाघे व त्याच्या सहकाऱ्यांनी अचानक हल्ला चढवून लाथाबुक्क्यांनी तसेच हत्याराने वार करुन मारहाण केली असल्याची घटना मागील महिन्यात १७ एप्रिल २०२५ गुरुवार रोजी रात्री आठ वाजे च्या सुमारास घडली होती.
ही घटना घडल्यानंतर अकस्मात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या स्वराज पक्षाचे ईश्वर शेलार यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला रस्त्याने पळत असतांनाच ईश्वर शेलार यांना त्याचे मित्र गफ्फार अरमान फकिर भेटले व मी त्यांच्यासोबत जखमी अवस्थेत रक्ताच्या कपड्यांसहीत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेलो असता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला उपस्थित असलेल्या पोलीसांनी माझी फिर्याद घेतलीं नाही तसेच याच वेळी राकेश वाघे याने थेट पोलीस स्टेशनला येऊन पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली होती असे तक्रारदार ईश्वर शेलार यांनी तक्रारी अर्जात नमूद केले असून पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी माझी फिर्याद लिहून न घेतल्याने त्याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे.
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत ईश्वर शेलार यांनी म्हटले आहे की दिनांक १७ एप्रिल २०२५ गुरुवार रोजी रात्री सुमारे आठ वाजे च्या सुमारास पिंपळगाव हरेश्वर येथील राकेश जग्गू वाघे याने त्याच्या भ्रमणध्वनीवरुन फोन करुन माझे तुझ्याशी काम आहे तु मला पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या मागे भेटायला ये असे सांगितले गावातील ओळखीची व्यक्ती असल्याने मी त्याने सांगितलेल्या ठिकाणी भेटायला गेलो असता तु स्वराज्य पक्षाचे काम करु नकोस तु स्वराज्य पक्षाचे काम केले तर मी तुला माझ्या वीस साथीदारामार्फत मारुन टाकले अशी धमकी दिली तेव्हा मी त्याला व त्याच्या धमकीला न घाबरता नकार दिला व परत निघालो होतो.
हे माझे उत्तर ऐकून राकेश वाघे याने त्याच्या लपून बसलेल्या साथीदारांना इशारा करुन बोलावून घेतले व मला मारहाण सुरु करत राकेश वाघे याने माझ्या डोक्याच्या वरच्या भागावर चापरने वार केला परंतु मी हाताने तो वार चुकवला याच वेळी राकेश वाघे याचा मित्र अभय पाटील याने माझ्या उजव्या बाजूच्या जबड्यावर फायटरने जोरदार वार केला तसेच सागर पाटील याने डोक्यात विट मारली परंतु विट पाठीवर लागली, राज धनगर याने कानाच्या मागे फायटरने वार केला व याचा मर्डर करुन टाका याला गाडी सहित पेटवून टाकु असे अजमल तडवी याने मारेकऱ्यांना सांगत मारठोक सुरु केली व माझ्या खिशातून ४७,२०० रुपये रोख रक्कम काढून घेतली यावेळी मी बचाव करण्यासाठी आरडाओरडा केला माझा आवाज ऐकून माझा मित्र भिकन तडवी धावत आला त्याने मला या मारहाणीतुन सोडवले.
मारेकरी निघून गेल्यावर मी माझे मित्र भिकन तडवी व गफ्फार फकिर यांच्यासोबत माझ्या डोक्यातून रक्त वाहत असतांनाच रक्ताच्या कपड्यासह गंभीर जखमी अवस्थेत तक्रार देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गेलो असता माझी तक्रार दाखल करुन घेतली नाही. याच वेळी राकेश वाघे याने पोलीस स्टेशनला येऊन उपस्थित पोलीसांसमोर मला जीवे मारण्याची धमकी दिली मात्र पोलीसांनी मला मेमो देऊन वैद्यकीय उपचारासाठी पिंपळगाव हरेश्वर सरकारी दवाखान्यात पाठवले होते परंतु मला जास्त मार लागला असल्याचे पाहून गंभीर दुखापत असल्याने मला पुढील उपचारासाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सांगितले होते.
म्हणून तातडीने १०८ नंबरवर फोन करुन रुग्णवाहिकेतून मला तात्काळ जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले याठिकाणी उपचारात माझ्या डोक्याला नऊ टाके टाकण्यात आले. दुसऱ्यादिवशी म्हणजे दिनांक १८ एप्रिल २०२५ शुक्रवार रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता माझी फिर्याद लिहून घण्यास नकार दिला याचवेळी मला चक्कर येत असल्याने मी पुन्हा तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो होतो मी जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांनाही राकेश वाघे याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व धमकी दिली की तु जर आमच्या विरोधात तक्रार दाखल केली तर मी तुझ्या विरोधात महिलांना खोटे गुन्हे दाखल करीन तसेच माझे हात वरपर्यंत आहेत तु कुठेही जा तुझी तक्रार कोणत्याही पोलीस स्टेशनला घेणार नाही अशी धमकी दिली होती असे ईश्वर शेलार याने लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे.
(या घटनेबाबत व तक्रारीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीनुसार काय खरे काय खोटे हे समजणे व जाणून घेणे शक्य झाले नाही.)
(*राकेश वाघे याच्या मागे रथी, महारथींचा हात*)
पिंपळगाव हरेश्वर येथील राकेश वाघे याचे वेगवेगळे व्यवसाय असून याच्याकडे जे. सी. बी. ट्रॅक्टर व इतर सामुग्री असल्याने शासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता व महसूल कर (रॉयल्टी) न भरताच पिंपळगाव हरेश्वर परिसरातील शासकीय भुखंड, गायराण जमीन व इतर ठिकाणाहून अवैध उत्खनन करुन माती, मुरुम, दगड व इतर गौण खनिजे परस्पर विक्री करुन भरमसाठ कामाई करत असुन शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्याने राजाश्रय मिळवून घेण्यासाठी राजकारणात उडी घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.