संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०५/२०२५
सद्यस्थितीत शिक्षणक्षेत्रातील मोठमोठे घोटाळे उघडकीस येत असून या घोटाळ्यांमध्ये बोगस शिक्षक भरतीचा खुप मोठा घोटाळा झाला असून यात बऱ्याचशा सुशिक्षित बेरोजगारांना गंडविण्यात आले आहे. तसेच अनेक हेराफेरी ची प्रकरणे बाहेर येत आहेत. असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यात घडला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून एकाच नावाच्या दोन शिक्षणसंस्था असल्याची बाब उघडकीस आली असून याबाबत चौकशी करुन कारवाई करावी म्हणून लोहारी येथील एका सुज्ञ नागरिकाने दिनांक २९ मार्च २०२५ शनिवार रोजी उपसचिव साहेब शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे ईमेल व्दारे रितसर तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे नवलभाऊ प्रतिष्ठान धुळे संचलीत दत्त माध्यमिक विद्यालय असून या शाळेची स्थापना सन १९९२ ला झालेली असून ही शाळा सुरळीतपणे चालवण्यात येत असून ही शाळा संबंधित नवलभाऊ प्रतिष्ठानतर्फे बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन यांना दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ मध्ये हस्तांतरित करण्यात आली असली तरी संबंधित संस्थाचालकाने शिक्षण विभाग व इतर विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक तर खोटे कागदपत्रे सादर करुन किंवा मोठ्या प्रमाणात आर्थिक देत करुन दोन वर्षें मागे जाऊन सन २० फेब्रुवारी २०१७ मध्ये नवीन शाळेचे ओपनिंग केले असल्या अजब, गजब प्रकार दिसून येत आहे.
म्हणून ही संस्था हस्तांतरित झाल्यापासून बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनचे संचालक, चेअरमन व सचिव यांनी शासनाची तसेच बेरोजगारांची फसवणूक करण्याकरिता बिस्मिल्ला मल्टीपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालय लोहारी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या शाळेची नवीन स्वयं अर्थसहाय्य २० फेब्रुवारी २०१७ रोजी नवीन शाळेची ओपनिंग केलेली आहे. मात्र तक्रारदाराच्या मतें एकाच गावात एकाच नावाच्या दोन शाळा कशा असू शकतात असा प्रश्न उपस्थित केला असून दत्त माध्यमिक विद्यालय लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या शाळेमध्ये स्वयं अर्थ सहाय्य व १००% ग्रँड एकाच शाळेत एकाच यु, डायस वर कशा पद्धतीने असू शकते याची सकल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.
तसेच शिक्षण विभागात आर्थिक देवाणघेवाण करत खूप मोठ्या प्रमाणात घोळ सुरु असल्याचा आरोप करत यात शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी हे साटेलोटे करण्यात माहीर असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला असून पुढील चौकशी व कारवाई करण्यासाठी मला २० फेब्रुवारी २०१७ मध्ये शाळेची नव्याने सुरुवात (ओपनिंग) करण्यासाठी ग्रामपंचायतीने दिलेला तसेच पंचायत समिती व जिल्हापरिषदेने दिलेला ठराव व सोबत जोडण्यात आलेल्या इतर सर्व आवश्यक कागदपत्रे त्वरित द्यावीत म्हणजे मी त्या कागदपत्रांच्या आधारे या संस्थेत झालेला घोटाळा सरकारच्या निदर्शनास आणून या घोटाळ्यात शिक्षण विभागातील ज्या, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली असेल त्यांच्या विरोधात मला कारवाई करणे सोपे होईल.
तसेच बिस्मिल्ला मल्टीपर्पज फाउंडेशनचे चेअरमन शरीफ बागवान तथा यांची संचालक मंडळाची सखोल चौकशी करून मला उत्तर देण्यात यावे. तसेच दोघ दत्त माध्यमिक शाळांचे यु, डायस नंबर देखील सोबत देण्यात यावे. अशी आपणास नम्र विनंती तक्रारदाराने उपसचिव साहेब शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे ईमेल व्दारे रितसर तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले जात आहे.