सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा उपयोग अजिंठा डोंगरातून उगम पावणाऱ्या नद्यांना व्हावा, श्री.‌ अर्जुन भोई.

गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा उपयोग अजिंठा डोंगरातून उगम पावणाऱ्या नद्यांना व्हावा, श्री.‌ अर्जुन भोई.

By Satyajeet News
May 11, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०५/२०२५

तीसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.‌ कारण जागतिक स्तरावर पाणीटंचाई वाढत आहे, ज्यामुळे भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.‌ कारण दिवसेंदिवस अनेक देशांमध्ये पाण्याचा पुरवठा कमी होत आहे, तर लोकसंख्या वाढत आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून ही पाण्याची कमतरता राजकीय अस्थिरता निर्माण करू शकते, ज्यामुळे युद्धे होऊ शकतात‌ असे मत काही जज्ञ मंडळींनी व्यक्त केले करत पाण्यासाठी दोन देशांमध्ये किंवा गटांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. व यातुनच पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होऊ शकते असे काही जाणकार तज्ञांचे म्हणणे आहे.

तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेली पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा योग्य वापर करणे आणि पाणी वाचवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पाणी संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नद्या, ओढे, तलाव, विहीरी यांसारख्या जलस्त्रोतांचे संरक्षण करणे आवश्यक असून त्यांना प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याने कालच तापी मधून उत्तर महाराष्ट्राची तृप्ती मेगा पुनर्भरण योजनेवर करार झाला, मागील काळात गुजरात राज्यासोबतचा नार व पार नद्यांच्या पाण्याचा उपयोग नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील तलावात साठवण करून त्याचा उपयोग सदर जिल्ह्यातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून केलेला करार आजही आठवणीत आहे.

तसेच जलसंपदा विभागा अंतर्गत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक नाशिक येथे संपन्न होऊन २०२७ साली नियोजित असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आढावा घेतला गेला आहे. आम्ही अपेक्षा करत आहोत की, गोदावरीखोऱ्यातील काही जलस्रोत हा अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या आणि उत्तरवाहीनी असलेल्या नद्यांमध्ये सोडल्यास त्याचा उपयोग या दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी निश्चित होईल यात शंका नाही.

अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या व उत्तरवाहीनी असलेल्या नद्यांमध्ये नांदगाव व चाळीसगांव तालुक्यातून वाहणारी मणियार नदी, कन्नडच्या घाटातून चाळीसगाव परिसरात वाहत येणारी नदी, नगरदेवळा परिसरातून वाहत जाणारी नदी, घाटनांद्रा परिसरातून वठाण पुढे पाचोराबाहेरपुरा परिसरातून वाहत पुढे जाणारी नदी, पिंपळगाव हरेश्वरजवळून उगम पावणारी नदी, सोयगाव परिसरातून उगम पावणारी सोनद नदी, अजिंठ्याच्या लेणीजवळून उगम पावणारी वाघुर नदी, तोंडापूर- टाकरखेडा परिसरातून वाहणारी कांगनदी यांच्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे पुनर्भरण सिल्लोड कन्नड परिसरातून केले तर निश्चितच या दुष्काळग्रस्त भागातील शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि त्यासाठी सदर विभागातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षाही अर्जुनभोई यांनी आमच्या प्रतिनिधीकडे केली.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 88
Previous Article

संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच ...

Next Article

लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची ग्राफ्लींग कुस्ती क्रीडा प्रकारात राष्ट्रीय आणि कुस्ती प्रकारात राज्य पातळीवर निवड.

    August 30, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    त्या घटनेचे चित्रकरण करणाऱ्या पत्रकारावरील अन्यायाविरोधात, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आक्रमक.

    December 15, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    ओबीसी आरक्षण वाचविण्या संदर्भात समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांचे पारोळा तहसीलदार यांना निवेदन.

    November 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    महा वितरण कंपनी म्हणजे विद्यूतचोरांची धणी. वाढीव बीलामुळे विद्यूतग्राहकांच्या डोळ्यात पाणी

    February 3, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    जीव जाईल तर जाईल पण जिलेबीच खाईल, फुकटच्या एस. टी. प्रवासासाठी जेष्ठ नागरिकांची धडपड.

    May 18, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पोलिसांच्या समस्या सोडवा, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

    April 13, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    कुटुंब बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत कुऱ्हाड येथे तीन लाख रोख रुपये रकमेची चोरी.

  • पाचोरा तालुका.

    ए. टी.‌ एम. सेवा सुरळीत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार व बॅंक व्यवस्थापकांची संयुक्त बैठक संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    स्वस्त धान्य वितरित करतांना शासकीय गोदामात सावळा गोंधळ, पाचोरा तालुक्यातील रेशनिंग दुकानदार, वड्याच तेल वांग्यावर काढत असल्याचा प्रकार.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज