सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›हॉटेलचे नाव तारांगणा, रात्रभर चालतोय दारुडे व जुगारींचा धिंगाणा.

हॉटेलचे नाव तारांगणा, रात्रभर चालतोय दारुडे व जुगारींचा धिंगाणा.

By Satyajeet News
April 16, 2025
0
0
Share:
Post Views: 539
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०४/२०२५

जळगाव जिल्ह्यात सगळीकडे गावठी व बनावट देशी, विदेशी दारुची अवैध विक्री तसेच सट्टा, ऑनलाईन चक्री व जुगाराचे अड्डे राजरोसपणे, दिवसाढवळ्या, दिवसरात्र सुरु आहेत. यामुळे अल्पवयीन मुलांसह तरुण तुर्क व म्हातारे अर्क दारु पिणे, जुगार खेळणे या व्यसनाच्या आहारी जाऊन यात मोठ्या प्रमाणात रोख पैसे, संसारोपयोगी वस्तू, महिलांच्या अंगावरील दाग, दागिने, धनधान्य विकून तसेच शेत, घर गहाण ठेवून किंवा हातावर लाखो रुपये व्याजाने घेऊन दारुच्या गुत्त्यावर व जुगाराच्या अड्ड्यावर पैसा उडवत आहेत. यामुळे गावागावांत व्यसनाधीन लोकांच्या घराघरात अशांतता पसरली असून यातून कौटुंबिक कलह होऊन महिलांना मारठोक केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

असाच काहीसा प्रकार पाचोरा ते लोहारा रस्त्यावर कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक दरम्यान एका शेतातील तारांगण नावाने सुरु असलेल्या हॉटेलमध्ये सुरु असून ही तारांगण हॉटेल फक्त आणि फक्त नावालाच असून याठिकाणी दररोज दुपारी तीन वाजेपासून तर दुसऱ्यादिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत दारुडे व जुगारींचा धिंगाणा सुरु असतो.‌ या हॉटेल तारांगणा मध्ये मुबलक दारु व खुलेआम पत्ता नावाचा जुगार खेळण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध असल्याकारणाने याठिकाणी सांगवी, वरखेडी, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, म्हसास तांडा या गावातून मोठ्या प्रमाणात तळीराम दारु पिण्यासाठी तर जुगारी जुगार खेळण्यासाठी येत असतात व याठिकाणी दुपारी तीन वाजेपासून जणू दारुडे व जुगारींची जत्राच भरते की काय असा अनुभव आसपासच्या व रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांना येतो विशेष म्हणजे याच ठिकाणाहून जवळच कुऱ्हाड बसस्थानक असून येथे शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींनी थांबत असतात.
*******************************************************
जुगाराच्या अड्ड्यावर पडतोय पैशांचा पाऊस, मोबाईल गहाण ठेवून जुगारी करतात हौस.
********************************************************
कुऱ्हाड खुर्द येथुन जवळच असलेल्या हॉटेल तारांगणा मध्ये तसेच जास्त जुगारी असल्यामुळे तारांगणा हॉटेलच्या मागिल बाजूस उघड्यावर जुगाराचे अड्डे बसतात. जुगार खेळतांना पैसे संपल्यानंतर जर अजून जुगार खेळायची ईच्छा असेल तर जागेवरच मोबाईल, दुचाकी किंवा अन्य मौल्यवान वस्तू गहाण ठेवून किंवा भरवशावर हजारो रुपये दर दिवसाला १० रुपये शेकड्याने पैसे दिले जातात याकरिता बारा तासांसाठी दहा रुपये शेकडा व्याज वसूल केले जाते तसेच वेळेवर पैसे परत न दिल्यास गहाण ठेवलेली वस्तू सावकाराकडे लहान होते यामुळे बरीचशी अल्पवयीन व तरुण मुले व्यसनपुर्ती करण्यासाठी लहानमोठ्या चोऱ्या करतात अशी माहिती समोर येत आहे.

म्हणून हॉटेल तारांगणा मध्ये दारुड्यांचा व जुगारींचा सुरु असलेला धिंगाणा थांबवण्यासाठी पोलीसांनी धाडसत्र राबवून याठिकाणी चालणारी अवैध दारुची विक्री व जुगाराचा अड्डा कायमस्वरुपी बंद करावा अन्यथा भविष्यात बरीचशी कुटुंबे बर्बाद होतील अशी शक्यता नाकारता येत नसल्याने हा अवैध दारुची विक्री व जुगाराचा अड्डा कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुकचे पोलिस पाटील, सरपंच व जबाबदार पोलीसांना दिसत नाही का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिक व त्रस्त महिलांनी उपस्थित केला असून येत्या दोन दिवसांत हॉटेल तारांगणा येथील अवैध धंदे बंद न झाल्यास लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त झालेल्या महिला, पुरुषांनी दिला आहे.

पुढील भागात ~ आम्ही वळण बांधल आहे. कोणाला कितीही बोंबा मारु द्या काही होणार नाही, पत्रकारांना पाहून घेऊ अशी भाषा वापरली जात असल्याने या तारांणा वरचा धिंगाणा थांबवण्यासाठी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीच्या ...

Next Article

नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटमध्ये पाचोऱ्याचा इनोव्हेटर्स संघ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    अज्ञात व्यक्तीने तन नाशक फवारल्याने दोन एकर कापूस जळुन खाक, कुऱ्हाड खुर्द येथील घटना.

    August 11, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    शिंदाड येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत तरुणांची टवाळखोरी.

    August 26, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, माजी आमदार भाजपच्या वाटेवर.

    February 10, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    सार्वे, जामने शिवारात बिबट्याची सलामी, कुत्री व पिल्लांचा केला खातमा.

    September 21, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्यावरील खड्ड्यांचा विसर पडावा म्हणून सा. बा. विभागाकडून झाडाझुडुपांचे घातक सुशोभीकरण.

    October 3, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    मंजाबाई भोईच्या मारेकऱ्याला अटक, मात्र इतरांचे काय ? पिंपळगाव हरेश्वर परिसरात चर्चेला उधाण.

    May 19, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • फोटो क्लीप

    ३० जानेवारी महात्मा गांधीजींची पुण्यतिथी निमित्त खासलेख, महात्मा गांधीच्या विचारांची आज भारताला सर्वाधिक गरज.

  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • पाचोरा तालुका.

    “जारगाव चौफुली वरील अवैद्य धंदे व वाढती गुंडगीरी बंद करा” किशोर डोंगरे यांची मागणी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज