अंबे वडगाव येथील हॉटेल प्रधानवर चोरट्यांचा डल्ला, दिड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०४/२०२५
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील दिलीप जैन यांच्या शेताजवळ पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी शालिग्राम ओंकार मालकर यांच्या मालकीचे हॉटेल प्रधान नावाने बिअर, बार असून या बिअर बार मध्ये दिनांक १३ एप्रिल २०२५ रविवार रात्री १२ वाजेपासून तर दिनांक १४ एप्रिल २०२५ सोमवार दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी हॉटेल प्रधान बिअर, बारचा लॉजकडे जाण्यासाठी असलेल्या जिन्याचा दरवाजा तोडून अनाधिकृतपणे प्रवेश करुन जवळपास सत्तर हजार रुपये किंमतीच्या देशी, विदेशी वेगवेगळ्या प्रकारच्या दारुच्या बाटल्या व काही रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
या चोरीच्या घटनेबाबत संकेत मालकर याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केल्यावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक आयुक्त निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे, उपनिरीक्षक मा. श्री. सर्जेराव क्षिरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनपर पुढील तपास सुरु केला आहे.
संबंधित घटनेतील चोरी करणारे हे पंचक्रोशीतील असावेत अशी चर्चा व शंका व्यक्त केली जात असून याबाबत कुणालाही काही माहिती असल्यास थेट शालिग्राम मालकर यांच्या या ९४२२५६८८७२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन हॉटेल प्रधानचे संचालक शालिग्राम ओंकार मालकर यांनी केले आहे.