आ. किशोर आप्पा पाटील यांच्याहस्ते डांभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांचे भूमिपूजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०४/२०२५
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या डांभुर्णी येथे आज दिनांक १४ एप्रिल २०२५ सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता पाचोरा, भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते जन सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अनुदानातून डांभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार असून या भूमिपूजन समारंभासाठी पाचोरा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. गोकुळ हे उपस्थित राहणार आहेत.
या ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आपण उपस्थित रहावे असे आवाहन डांभुर्णी गावच्या सरपंच मा. सौ. अल्काबाई परदेशी, उपसरपंच मा. श्री. संतोष भाऊ परदेशी, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मा. श्री. प्रकाश भाऊ तांबे, ग्रामविस्तार अधिकारी मा. श्री. शरद पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. संतोष परदेशी, पोलीस पाटील मा. श्री. संजय परदेशी सर्व ग्रामपंचायतींचे व डांभुर्णी गावच्या ग्रामस्थांनी केले आहे.