इलेकट्रीक पाणबुडी मोटार व दुचाकी चोरट्यांना जळगाव गुन्हा शाखेकडून अटक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०४/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ८५/२०२५ भारतीय न्याय संहिता ३०३ (२) या चोरीच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरच्या भागातील होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास जळगाव गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बबनराव आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक रणजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील यांचे एक पथक तयार करुन तपासकामी पाठवण्यात आले होते.
या गुन्हा शाखेच्या पथकाने गोपनीयता बाळगून तपास सुरु केला असता पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील सचिन बापुराव पाटील याने त्याच्या साथीदारासह इलेक्ट्रीक पाणबुडी मोटारींची चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त खबऱ्या कडून मिळाली होती. या मिळालेल्या माहितीवरुन संशयित सचिन पाटील याचा तपास केला असता तो त्याच्या घरीच असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी जाऊन सचिन पाटील याला ताब्यात घेऊन त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने सचिन बापुराव पाटील वय वर्षे (२९) राहाणार पिंप्री (सार्वे) असे सांगितले यावरुन ओळख पटताच त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सचिन पाटील याने त्याचे पिंप्री येथील साथीदार भगवान लक्ष्मण पाटील, राहुल त्र्यंबक पाटील यांच्या सोबत मिळून चोऱ्या केल्याचे कबूली दिली होती.
यात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ८५/२०२५ भारतीय न्याय संहिता ३०३, (२) तसेच गुन्हा रजिस्टर नंबर ११५/२०२२ भारतीय न्याय संहिता ३०३, (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यांतील इलेक्ट्रीक पाणबुडी मोटारींची चोरी केल्याची कबुली दिल्यावरुन सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन सचिन पहिला याचे साथीदार पिंप्री येथील भगवान लक्ष्मण पाटील, राहुल त्र्यंबक पाटील या दोघांचा शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी व विचारपूस केली असता या तिघांनी चोऱ्यांची कबूली देत चोरी केलेल्या एकुण १७ नग इलेक्ट्रीक पाणबुडी मोटारींची काढून दिल्या होत्या.
तसेच संशयित आरोपी सचिन पाटील, भगवान पाटील यांना विचारपूस केली असता त्यांनी पाचोरा शहरातील चोरुन नेल्याची कबूली देत चोरुन नेलेल्या चार मोटारसायकल काढून दिल्याने सदर मोटारसायकल चोरी बाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर ७९/२०२५ भारतीय न्याय संहिता ३०३, (२), पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर १४६/२०२५ भारतीय न्याय संहिता ३०३ प्रमाणे दाखल गुन्ह्यांबाबत त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली आहे.