पाचोरा येथील सु. भा. पाटील. विद्या मंदिरातील विद्यार्थी आय. टी. एस. परिक्षेच्या गुणवत्ता यादीत.

चेतना हिरे.(वरखेडी)
दिनांक~१२/०४/२०२५
पाचोरा तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या शाळेची शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यावर्षीही सोळा विद्यार्थ्यांनी आय. टी. एस. परिक्षेत घवघवीत यश मिळवून केंद्र, राज्य व जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत शाळेचे आपले नाव झळकावले आहे.
या गुणवत्ता यादीत इयत्ता पहिलीचा निर्मल राहुल मेटकर पहिला, विधान कोमल वाघ, यशश्री प्रवीण जगताप, यशराज रवींद्र गढरी, श्रीरंग देवेंद्र पाटील, वैदेही प्रमोद महाजन, रुद्र राहुल पेंढारकर, निशांत सुदर्शन चौधरी, जानवी अतुल कुमावत, मयंक योगेश सुतार, कुणाल गजानन, वैभव किशोर नरेराव, प्राजस दिनेश महाजन मयूर पूनम निकम, कार्तिक ज्ञानेश्वर कापडे, प्रांजल धनंजय भावसार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप वाघ, चेअरमन नानासाहेब मा. श्री. संजयजी वाघ, मानद सचिव दादासाहेब मा. श्री. महेश देशमुख, व्हाइस चेअरमन दादासाहेब मा. श्री. व्ही. टी. जोशी सर, शालेय समिती चेअरमन बापूसाहेब मा. श्री. जगदीश सोनार व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका श्रीमती. उज्वला साळुंखे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले