कुऱ्हाड खुर्द येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवात निमित्ताने बारा गाड्या, हनुमान जयंती.
सुनील लोहार.(कुऱ्हाड खुर्द)
दिनांक~११/०४/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील मागील दिडशे वर्षांपासूनची परंपरा असलेला खंडेराव महाराज यात्रोत्सव दिनांक १२ एप्रिल २०२५ शनिवार रोजी सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येणार असून या यात्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळी ध्वजारोहण, आरती, दुपारी नैवेद्य व पुजन तसेच सायंकाळी पाच वाजता बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या या यात्रोत्सवात सामिल होऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रोत्सवाचे आयोजक भगत परिवार व कुऱ्हाड खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.
कुऱ्हाड खुर्द येथील खंडेराव महाराज हे जागृत देवस्थान असून मागील दिडशे वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरु असून खंडेराव महाराज नवसाला पावतात अशी भाविकांची भावना असल्याने बरेचसे भाविक याठिकाणी येऊन नवस कबूल करतात व आपली मान पुर्ण झाल्यावर ते चैत्र पौर्णिमेला सायंकाळी बारा गाड्या ओढून आपला मनोभावे नवस फेडतात अशी अख्यायिका आहे.
तसेच बारा गाड्या ओढून झाल्यावर खंडेराव महाराज मंदिरात खारीक, खोबरे व हळदीचा भंडारा उधळला जातो. यामुळे मंदिरासह संपूर्ण परिसरात हळदीचा जणू पाऊसच पडलेला दिसून येतो. तसेच मागील दिडशे वर्षांपासून भगत परिवारातर्फे या यात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवली असून या दिवशी भगत परिवारातर्फे उडदाची डाळ व भाकरीच्या प्रसादाचा भंडारा केला जातो. या यात्रोत्सवात हजारो भाविक खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन “दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ” अशा पध्दतीने श्लोक म्हणत मनोभावे डाळ व भाकरीच्या प्रसादाचा अस्वाद घेतात.
*************************************************
खंडेराव महाराज यात्रा व हनुमान जयंती एकाच दिवशी हा दुग्धशर्करा योग.
*************************************************
तसेच दिनांक १२ शनिवार रोजी हनुमान जयंती असल्याने कुऱ्हाड खुर्द येथील गावठाण ग्रुप तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान जयंती साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने हनुमानजीच्या प्रतिमापूजन करुन ढोल, ताशा व बॅंड पथकाच्या वाद्यावर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी जास्तीत, जास्त भाविक, भक्तांनी या जयंती उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.