पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. नामदेव इंगळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०४/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. नामदेव इंगळे यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून वरखेडी ब्रिटनमध्ये काम करत असतांना त्यांनी वरखेडी गावातील अवैध धंदे तसेच वरखेडी हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असल्याने दर गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांना शिस्त लाऊन तसेच छोट्या, मोठ्या होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र थांबवले आहे.
तसेच मार्च महिन्यात भारतीय न्याय संहिता कलम २८५ प्रेमाने गुन्हे दाखल करुन मा. न्यायालय पाचोरा येथील लोकन्यायालयात गुन्हे शाबित केले तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३०३/२०२४ मधील फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. तसेच वरखेडी सह बिट अंतर्गत येणाऱ्या आसपासच्या गावागावांतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मेहनत घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. विशेष म्हणजे वरखेडी येथे ऑनलाईन सट्टा (चक्री) नावाच्या जुगाराचे अड्ड्यावर कारवाई केली या सर्व कामांची दखल घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांच्याकडून पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे यांना प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.
*************************************************
वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मी हे काम करु शकलो, पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. नामदेव इंगळे.
*************************************************
आज जरी मला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले असले तरी यामागे वरिष्ठ अधिकारी यांनी मला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन टाकलेली जबाबदारी यामुळे मी ही कामगिरी करु शकलो असे मत पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. नामदेव इंगळे यांनी व्यक्त केले.