महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२५
आज दिनांक १० एप्रिल २०२५ गुरुवार रोजी भगवान महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत श्री. ललित गांधी, अध्यक्ष, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ, मुंबई, श्री. गोपाल भावलाल कोळी, अध्यक्ष, गोवर्धन गोशाळा निमगाव, विविध जैन व अहिंसावादी संघटना यांच्या पत्राच्या अनुषंगाने तसेच महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक संकीर्ण १०/२००२/प्रत्र क्रमांक १११/ नवी २७ दिनांक २८ मार्च, २००३ अन्वये दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात दिनांक १० एप्रिल २०२५ गुरुवार रोजी “महावीर जयंती असल्याने कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत सदर्भीय पत्राद्वारे विनंती केलेली आहे.
तरी उक्त नमूद शासन शासनपत्रकात दिलेल्या सूचना विचारात घेऊन दिनांक १० एप्रिल २०२५ गुरुवार रोजी “महावीर जयंती असल्याने कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत आपले स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे (गजेंद्र पाटोळे) अपर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी नोटीस व्दारे जाहीर केले आहे.
तरी शहरातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीचे संबंधित पदाधिकारी, अधिक व कर्मचाऱ्यांनी या आदेशानुसार कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.