निसर्गाच्या ढसाळ वातावरणात वरखेडी येथील चक्री वादळावर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घातला पायबंद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२५
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरखेडी येथील बाजारपेठेत काही इसम स्वताच्या फायद्यासाठी कॉम्प्युटरच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने चक्री नावाचा सट्टा (जुगाराचा) खेळ खेळवत असून या जुगाराच्या नादात अल्पवयीन मुले, तरुण वर्ग व सर्वसामान्य नागरिक दररोज हजारो रुपये गमावत असल्याची गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांना मिळाली होती.
या मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. सर्जेराव क्षिरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, नामदेव इंगळे, दिपक आहिरे, विकास पवार यांना वरखेडी बाजारपेठेत जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार उपनिरीक्षक मा. श्री. सर्जेराव क्षिरसागर यांनी दिनांक ०१ एप्रिल २०२५ मंगळवार रोजी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन वरखेडी येथील बाजारपेठेत जाऊन खात्री केली असता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकला असता सदर बाजार पट्टा भागात वरखेडी येथील संशयित आरोपी सागर चौधरी हा स्वताच्या फायद्यासाठी कॉम्प्युटरच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने चक्री नावाचा सट्टा चालवतांना आढळून आला होता.
यावरुन पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित दिलीप निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सागर चौधरी याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला (सी. सी. टी. एन. एस) गुन्हा रजिस्टर नंबर ७९/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन सॅमसंग कंपनीची एल. इ. डी. आणि सी. पी. यू. केबल ॲडेप्टर, किबोर्ड, माऊस तसेच १५००/०० रुपये रोख रक्कम असा २७,१०० रुपयांचा मुद्देमालासह जप्त करुन संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण लक्ष्मण ब्राम्हणे हे करीत असल्याचे समजते.
या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे आभार मानले असून यापुढेही कारवाईत सातत्य ठेऊन हे अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.