छत्रपती व पेशव्यांना कबर का खटकली नाही?
औरंगजेब बादशाहाने छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला.हा रक्तरंजीत इतिहास आहे.त्याचा अतिरिक्त रक्तरंजित सिनेमा बनवून मुर्ख लोकांची माथी भडकवली जात आहेत.हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मातील अशिक्षित, अल्पशिक्षित, अल्प बुध्दी तरूणांना भडकवले जात आहे.यात दोन्ही धर्मातील बुद्धिमान,उच्चशिक्षित,व्यवसायिक, उद्योगपती भाग घेत नाहीत. ठराविक लोकच का भाग घेत आहेत?कारण यांची बौद्धिक क्षमता कमी आहे.
इतिहासातील रक्तरंजित घटनांचे अवास्तव चित्रण करून पैसा कमावणारे सिनेमा वाले आणि मतांचे धृवीकरण करणारे दुष्ट बुद्धीचे राजकीय नेते गैरफायदा घेत आहेत.ज्या लोकांना जनतेने विकासासाठी आमदार निवडून दिले तेच विधानसभेत जाऊन भडक बोलत आहेत.जर औरंगजेब बादशहाची कबर पुरातत्व विभागाच्या अधीन नसती तर आम्ही निर्णय घेऊन उखडली असती.जर फडणवीस यांना खरोखरच कबर उखडून फेकायची असेल तर लोकांना प्रवृत्त करण्याऐवजी स्वतः टिकम पावडी घेऊन का उखडवत नाहीत? स्वतः उखडून,पोतडी भरून नागपूरच्या आरएसएस कार्यालयात ठेवा.सांगा, आम्ही औरंगजेबाचा बदला घेतला आहे.आता आम्हाला मतदान करा.आम्ही निवडून सत्तेवर आलो कि सत्तेवर येऊ.जनतेची लुटमार करू.
तरूणांनी इतिहास वाचला पाहिजे.फक्त शब्द नव्हे, तर्क केला पाहिजे.
औरंगजेब बादशहाचा मृत्यू १७०७ मधे झाला.तेंव्हा कबर बांधली.१७०८ ते १७४९ दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराज हे साताराचे छत्रपती होते.जर पित्याचा छळ करून,हाल करून मारले तर त्यांना राग आला पाहिजे.पण तब्बल ३१ वर्षे सत्ता असताना त्यांना कबर खटकली नाही.उखडून फेकली नाही.का नाही? यांची माहिती इतिहास संशोधकांकडून घेतली पाहिजे.छत्रपतींचा आदर करतात तर त्यांच्या निर्णयाची सुद्धा कदर केली पाहिजे.
औरंगजेब बादशहाचा मृत्यू १७०७ मधे झाला.त्यांनतर १८१८ पर्यंत तब्बल १११ वर्षे पेशव्यांची सत्ता होती.त्यात सहा पेशवे झाले.पैकी बाजीराव पेशवा आणि रघुनाथराव पेशवा तर प्रबळ होते.नाना फडणवीस खूप बुद्धिमान होते.तरीही ती कबर का खटकली नाही?आत्ताच का खटकते?
औरंगजेब बादशहाची कबर आत्ताच का खटकते?याचा अभ्यास तरूणांनी केला पाहिजे.सिनेमा पाहून मत बनवणे अल्लडपणाचे,नादानपणाचे,बालबुद्धीचे लक्षण आहे.यात कोणतीही वीरता,शूरता नाही.बाजीराव पेशवा,नाना फडणवीस, रघुनाथराव पेशवा यांच्या पेक्षा राणे किंवा फडणवीस जास्त शूर आहेत का? जास्त बुद्धिमान आहेत का?हे शूर वीर नाहीत.हे वाचाळवीर आहेत.हे विधायक काम न करता विध्वंसक काम करीत आहेत.
आज रोजी महाराष्ट्रातील ६० टक्के लोक मेंदूचा वापर करीत नाहीत.त्यांनी आपले मेंदू गहाण ठेवलेले आहेत.मोदींनी कोरोना महामारीत ताट वाजवले म्हणून ६०टक्के लोकांनी ताट वाजवले.का वाजवले?हे कोणीही विचार केला नाही.मोदींनी शेणाचे बोट नाकात घालून सुंगले तर ६० टक्के लोक तसेच बोट घालून सुंगतील.कारण या लोकांची बुद्धी गहाण ठेवलेली आहे.ते बुद्धीहीन एलियन्स बनलेले आहेत.मदारीने टोपी घातली.माकडांनी टोप्या घातल्या.मदारीने टोपी फेकली.माकडांनी टोप्या फेकल्या.
जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे कि भारतातील लोक मेंदूचा वापर फक्त १०टक्के करतात.९० टक्के मेंदू वापरत नाहीत.मरेपर्यंत तसाच पडून राहातो. ठिसूळ बनतो.किंवा विषाणूंची लागण होऊन सडतो.म्हणून तूप टाकून जाळावा लागतो.
तरूणांनो, तत्कालीन छत्रपती आणि पेशव्यांना ती कबर १११ वर्षे का खटकली नाही?याचा अभ्यास करा. चर्चा करा.उत्तर शोधा.नाना फडणवीस यांना खटकली नाही? देवेंद्र फडणवीस यांनाच का खटकते?
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.
…..