२२ मार्च रोजी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. शालिग्राम मालकर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२५
ओबीसी समाजाचे तारणहार समता सुर्य माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. छगनराव भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत दिनांक २२ मार्च २०२५ शनिवार रोजी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील माळी समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकर्ते व समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे तसेच आपल्या परिसरातील व संपर्कातील समस्त बारा बलुतेदार ओबीसी समाज बांधवांना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. शालिग्राम मालकर यांनी केले असून महाएल्गार मेळाव्याचे ध्येय, धोरणं समजून सांगण्यासाठी ते जिल्हाभरात दौरा करणार असून या दौऱ्यात ते गावागावात बैठका घेणार असल्याचे सांगितले असून या बैठकांना समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबुलाल माळी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
जळगाव येथे घेण्यात आलेल्या ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्याला डॉ. नलिनी पाटील (प्रदेश सचिव), भास्कर ओंकार पाटील प्रदेश (सहसचिव), ॲड. वैशाली महाजन (विभागीय महिला अध्यक्षा), दिनेश रघुनाथ पाटील (माजी,जिल्हाध्यक्ष), धनराज माळी सर (संयोजक), प्रदिप हिलाल महाजन (संयोजक), शामराव पाटील सर (माजी जिल्हाध्यक्ष), भिमराव महाजन (जिल्हा कार्याध्यक्ष), कैलास माळी जिल्हा (कार्याध्यक्ष), प्रल्हाद सिताराम माळी (जिल्हा संघटक), अंतु लहासे (जिल्हा संघटक), हनुमंत महाजन (जिल्हा सरचिटणीस),वणा माळी सर (जिल्हा उपाध्यक्ष), गोकुळ रोकड़े (जिल्हा उपाध्यक्ष), विनोद पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), संतोष माळी (जिल्हा उपाध्यक्ष),दिनकर माळी जिल्हा (चिटणीस), रमेश महाजन जिल्हा (चिटणीस), दिलीप माळी (जिल्हा चिटणीस), दगडू माळी (जिल्हा चिटणीस), संजय माळी (जिल्हा कोषाध्यक्ष), संजय पाटील (जिल्हा चिटणीस), रमेश महाजन (जिल्हा चिटणीस), गणेश महाजन (जिल्हा संघटक), सौ. पुष्पाताई महाराज (महिला जिल्हाध्यक्षा), कु. गायत्री शिरसागर (युवती जिल्हाध्यक्षा), प्रा. डॉ. स्वप्निल पाटील (प्रज्ञावंत आघाडी जिल्हाध्यक्ष), मनोन माळी (कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष) गौरव माळी (युवक जिल्हाध्यक्ष), प्रभाकर जाधव (जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक आघाडी), दिपक माजी (महानगर जिल्हाध्यक्ष), संजय व्यापारी (आघाडी जिल्हाध्यक्ष), प्रा. हिरालाल पाटील, प्रा. नितीन चव्हाण, तालुका अध्यक्ष भागवत बोंबटकर (मुक्ताईनगर), प्रशांत महाजन (चाळीसगाव), अमोल माळी (अमळनेर), छोटु रा माळी तालुका (पारोळा),प्रशांत पाटील तालुका (रावेर), नरेश महाजन तालुका (जामनेर), संतोष महाजन (यावल), दिपक महाजन (भडगाव), सुनिल महाजन जळगांव ग्रामिण, रूपेश महाजन (चोपड़ा), विजय माळी (भुसावल) दिनेश माळी (बोदवड), संतोष महाजन (पाचोरा), नरेंद्र पाटील (धरणगाव) या उपस्थितांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.