पाचोरा तालुक्यातील बहुळा धरणात अज्ञात महिलेने घेतली उडी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२५
पाचोरा तालुक्यातील बहुळा धरणात एका अज्ञात महिलेने आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उडी घेतल्याची घटना घडली असून संबंधित महिलेने धरणाच्या पाण्यात उडी घेतल्याचे लक्षात येताच या धरणात मच्छिमारी करणाऱ्या हुसेन शहा याने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन बाहेर काढले व महसूल सेवक ईश्वर पाटील व वाहन चालक लाला पिंजारी यांच्या मदतीने संबंधित महिलेस बेशुद्ध अवस्थेत पाचोरा येथील नगरपालिका रुग्णालयात दाखल केले.
नगरपालिका रुग्णालयात दाखल केल्याबरोबर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेवर अत्यावश्यक उपचार करुन परिस्थिती अत्यावस्थ असल्याकारणाने पुढील उपचारासाठी पाचोरा येथील विध्नहर्ता रुग्णालयात पाठवले असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
सुचना ~
संबंधित महिलेची ओळख पटल्यास संबंधितांनी पाचोरा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.