पाचोरा शहराला भुकंप सदृश्य धक्यांची जाणीव, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांच्याकडून चौकशीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२५
पाचोरा शहरातील काही भागात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भुकंप सदृश्य धक्यांची व हादरे बसल्याची जाणीव झाली असून हा खरा प्रकार काय आहे याची चौकशी केली जावी अशी मागणी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोठा आवाज होऊन सोबतच खिडकीच्या काचांचा देखील आवाज आला व जमिनीला हादरे बसल्याची जाणीव झाल्याची घटना समोर येत असून याचा प्रत्येक्ष अनुभव कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांनी अनुभवला असून हा खरा प्रकार काय आहे याची नेमका हा मोठा आवाज तसेच खिडकीच्या काचांचा आवाज व जमीनीला बसलेले हादरे हा काय प्रकार आहे हे नेमके कशामुळे घडले याची चौकशी करुन प्रशासनाने त्वरित खुलासा करावा म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनातील भिती दूर होईल असे मत व्यक्त केले.
तसेच पाचोरा तालुक्यांसह सगळीकडे होणारी बेसुमार वृक्षतोड, सार्वजनिक भुखंडावर अवैध उत्खनन करुन गौण खनिजाची उचल, यामुळे पडलेल्या मोठ, मोठ्या खदाणी, उत्खनन करण्यासाठी वापरली जाणारी घातक स्फोटके यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला असल्याने भविष्यात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल म्हणून या सर्व गैरप्रकारांना त्वरित आळा घालण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.