पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची धडक कारवाई कुऱ्हाड बुद्रुक येथील चार संशयित ताब्यात, पशुधन पालकांकडून समाधान व्यक्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२५
पाचोरा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी धडक कारवाई करत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला मागील काळात दाखल असलेल्या गुरे चोऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील चार संशयितांना ताब्यात घेऊन आज पाचोरा मा. न्यायालयात हजर करणा असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गुरेढोरे चोरी करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच मागील काळात कुऱ्हाड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून बैलजोडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून या गुरे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जळगाव गुन्हे शाखा जळगाव व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर व त्यांचे सहकारी हे कसून तपास करत होते.
मागील वर्षी कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक व आसपासच्या गावातील पशुधन मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या तसेच सोलर पॅनलच्या विद्युत पंपाच्या मोटारी, पाणबुडी विद्युत पंप, ठिंबक संच व इतर शेती अवजारे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हे चोऱ्यांचे सत्र आजही सतत सुरु असून या वस्तू चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळ्या सक्रिय झालेल्या असून हे चोरी करणारे गावागावातील स्थानिक लोकांना हाताशी धरुन त्यांना पैसे देऊन त्यांच्या मदतीने गुरे चोरी करत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांना मिळाली होती.
एकाबाजूला गुरेढोरे व शेती अवजारे चोऱ्यांचे सत्र सुरु असतांनाच दुसरीकडे जळगाव गुन्हे शाखा व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने गोपनीय माहितीच्या आधारे काल कुऱ्हाड गावातून चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना आज पाचोरा मा. न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यातील विशेष करुन कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक येथील नागरिकांनी जळगाव व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे कौतुक केले असून या पकडण्यात आलेल्या चोरांची सखोल चौकशी केल्यास अजून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.





