परिक्षा केंद्रावर शिक्षक गैरहजर राहिल्या प्रकरणी, पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२५
महाराष्ट्रात दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ मंगळवार पासून बारावीच्या माध्यमिक शिलांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येत असून या परिक्षा कापी मुक्त व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात म्हणून शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाकडून काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. असे असले तरी पाचोरा तालुक्यातील कासमपूरा येथील परिक्षा केंद्र क्रमांक ८३७ येथे नियुक्त केलेल्या दोन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी म्हणजे परिक्षेच्या पहिल्याच दिवशी दांडी मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील शिक्षक श्री. चिंतामण शंकर वाघे व श्री. शैलेंद्र भास्कर मालकर यांची पाचोरा तालुक्यातील कासमपूरा येथील परिक्षा केंद्र क्रमांक ८३७ येथे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व संबंधित शिक्षकांना केंद्र संचालकांनी तसे आदेश दिले होते. असे असतांनाही संबंधित दोघेही शिक्षकांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी कासमपूरा येथील परिक्षा केंद्रावर हजेरी न लावत परस्पर दांडी मारली असल्याची बाब उघडकीस आली आहे.
या नियुक्त केलेल्या शिक्षकांनी संबंधित विभागाला कोणत्याही प्रकारची रितसर माहिती न देता दांडी मारल्याने संबंधित केंद्र संचालकांना पर्यवेक्षण करणेकामी अडचणी निर्माण झाल्या होत्या याची दखल घेऊन पाचोरा पंचायत समितीचे मा. गट शिक्षणाधिकारी यांनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ गुरुवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना रितसर नोटीस पाठवून संबंधित शिक्षक हे परीक्षेकामी उपस्थित का राहू शकले नाहीत याबाबत संबंधित शिक्षकांचा लेखी खुलासा मागितला आहे.
तसेच लेखी खुलासा घेऊन त्यांचेवर रितसर कार्यवाही प्रास्थापित करण्याबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांच्या आत सादर करावा म्हणजे संबंधितांवर कारवाई करणेबाबत म. विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ नाशिक व म. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हापरिषद जळगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठवले सोपे होईल असे नमूद केले असून जे कर्मचारी आदेश देऊनसुद्धा परिक्षा कालावधीत केंद्रावर उपस्थित राहून कामकाज करत नसतील तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाचोरा यांनी स्पष्टपणे नमूद केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.