पाचोरा तालुक्यातील लकी ड्रॉ मध्ये फसवणूक झालेले कुपन धारक वसमत येथील श्री. कृष्ण मंगल कार्यालयावर धडकणार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२५
मागील वर्षी शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाखाली ठिकठिकाणी लकी ड्रॉ चे आयोजन करुन मोठमोठ्या बक्षीसांचे अमिष दाखवून लकी ड्रॉ न काढताच पळ काढून लाखो रुपयांची लूट करणारी एक टोळी महाराष्ट्रात सक्रिय असून या टोळीने अगोदर दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पाचोरा शहरात लकी ड्रॉ न काढताच पळ काढला होता तसेच दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी टाकळी रोड पूर्णा येथे लकी ड्रॉ स्कीमचे जाळे पसरवून १५००/०० रुपये प्रमाणे कुपन विक्री करुन लाखो रुपये जमवून लकी ड्रॉ काढतांना हात चलाखी करुन जवळच्याच लोकांच्या नावाने मोठ्या बक्षिसांचे कुपन काढून इतर सभासदांच्या डोळ्यात धुळफेक केली होती अशी माहिती समोर येत असून आता दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी वसमत शहरातील श्री. कृष्ण मंगल कार्यालय येथे लकी ड्रॉ स्कीमचे जाळे पसरवले आहे.
पाचोरा व पूर्णा येथे लकी ड्रॉ न काढताच पळ काढलेल्या याच टोळीने आता पूर्णा शहरात महालक्ष्मी इंटरप्रासेसच्या नावाने पुन्हा एकदा लकी स्कीम सुरु केली असून १५००/०० रुपये प्रमाणे हजारो कुपनांची विक्री केली असून हा लकी ड्रॉ वसमत येथील श्री. कृष्ण मंगल कार्यालय नवोदय विद्यालय रस्त्यावर होणार असल्याचे जाहीर केले आहे.
मात्र हे मातोश्री इंटरप्रासेसच्या तसेच वेगवेगळ्या नावाखाली लकी ड्रॉ काढून ठिकठिकाणी भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करत असल्याने हा लकी ड्रॉ त्वरित थांबण्यासाठी पाचोरा तालुक्यातील श्री. महालक्ष्मी इंटरप्रासेसच्या नावाखाली तिकीट विक्री करुन फसवणूक करुन फरार झालेल्या आयोजकांना पकडून त्यांच्याकडून कुपनचे पैसे वसुल करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील जवळपास तीस कुपनधारक वसमत येथील श्री. कृष्ण मंगल कार्यालयावर जाऊन तेथे त्यांनी पोलखोल करुन वसमत पोलीसांच्या मदतीने त्यांचा भांडाफोड करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.