महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाच्या महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्यासाठी परवानगीची गरजच काय ? श्री . हरीभाऊ पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा~०१/०२/२०२५
आपल्या देशासाठी बहुजन समाजातील महापुरुषांनी घरावर तुळशीपत्र ठेवून स्वताच्या जीवावर खेळून सर्वधर्मसमभाव हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जनहित व देशहितासाठी काहींनी आपले आयुष्य घालवले तसेच काही महापुरुषांनी आपल्या जीवाचे बलीदान दिले अशा सर्व थोर समाजसुधारक महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्यासाठी वारंवार परवानगी घ्यावी लागते ही बाब न पटण्यासारखी असून सर्व थोर महापुरुषांचा इतिहास सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहित तसेच या महापुरुषांचे जयंती उत्सव सालाबादप्रमाणे साजरे केले जातात मग दरवर्षी परवानगी घेण्याची गरजच काय ? असा प्रश्न अखिल भारतीय मराठा महासंघ जळगावचे जिल्हा संपर्कप्रमुख व बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हा प्रश्न उपस्थित केला असून कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून जयंती उत्सव साजरा करतांना संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे एक विनंती अर्ज देऊन आपण जयंती उत्सव साजरा करतांनाची वेळ, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या मार्गाने कशा पध्दतीने मिरवणूक काढणार आहेत तसेच या मिरवणुकीत डी. जे. ढोल, ताशा किंवा अन्य कोणती वाजंत्री लावणार आहेत या मिरवणुकीत कोणते देखावे सादर करणार आहेत, मिरवणुक कीती वेळात आटोपली जाईल याबाबत एका साध्या कोऱ्या कागदावर माहिती देऊन पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी संबंधित उत्सव समितीच्या माध्यमातून विनंती अर्ज करावा म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे मत मा. श्री. हरीभाऊ पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच या महापुरुषांचे जयंती उत्सव स्वातंत्र्योत्तर काळापासून आजतागायत कायम साजरे केले जातात व याबाबतच्या सर्व नोंदी शासन व प्रशासनाकडे आहेत. तसेच आम्ही हे उत्सव साजरे करतांना नव्याने पायंडा पाडत नसल्याने सालाबादप्रमाणे जयंती उत्सव साजरे करतांना पोलीस प्रशासनाकडे फिरावे लागते हा त्रास कमी होण्यासाठी एका विनंती अर्जावर संबंधित उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी देऊन योग्य सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.