मोहने, आंबिवली येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी महा रक्तदान शिबीराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२५
कल्याण तालुक्यातील मोहने, आंबिवली या शहरात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जय सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेची कल्याण शाखा व डोंबिवली येथील डोंबिवली ब्लड सेंटर रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या महारक्तदान शिबिरात सर्व समाज बांधवांनी जास्तीत, जास्त संख्येने उपस्थिती राहुन रक्तदान करुन योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच या रक्तदान शिबिरात ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून ज्यांना, ज्यांना रक्तदान करायचे असेल त्यांनी कैलास तवर (८२८६८२८६४२) तेजस्वी डायग्नोस्टीक व पॅथॉलॉजी सेंटर बुद्ध विहार तसेच डॉ. युवराज पवार (९६०४०८०८८४) चिरंजीव लहान मुलांचे हॉस्पिटल, बाजारपेठ मोहने, आंबिवली, रमेशभाऊ राठोड. (९७०२६६२२०९) मोहने आंबिवली यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
या भव्य अशा रक्तदान शिबिरासाठी श्री. जय सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष इंदलभाऊ चव्हाण, संचालक कैलासभाऊ तवंर, विष्णूभाऊ पवार, अजयभाऊ पवार, गणेशभाऊ राठोड, तुकारामभाऊ चव्हाण, गोकुळभाऊ राठोड, सतिश भाऊ राठोड, बळीराम भाऊ राठोड, संचालिका सौ. अनुसयाबाई चव्हाण, श्रीमती सगुणाबाई चव्हाण व इतर पदाधिकारी अथक परिश्रम घेत असून या शिबिरात जास्तीत, जास्त संख्येने उपस्थिती राहुन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.