मातोश्री इंटरप्रासेसचा त्याच तिकीटावर तोच खेळ, सर्वसामान्य जनतेची लाखो रुपयांची लूट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२५
शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाखाली ठिकठिकाणी लकी ड्रॉ चे आयोजन करुन मोठमोठ्या बक्षीसांचे अमिष दाखवून लकी ड्रॉ न काढताच पळ काढून लाखो रुपयांची लूट करणारी एक टोळी महाराष्ट्रात सक्रिय असून या टोळीने अगोदर दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पाचोरा शहरात लकी ड्रॉ न काढताच पळ काढला होता तसेच दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी टाकळी रोड पूर्णा येथे लकी ड्रॉ स्कीमचे जाळे पसरवून १५००/०० रुपये प्रमाणे कुपन विक्री करुन लाखो रुपये जमवून लकी ड्रॉ काढतांना हात चलाखी करुन जवळच्याच लोकांच्या नावाने मोठ्या बक्षिसांचे कुपन काढून इतर सभासदांच्या डोळ्यात धुळफेक केली होती अशी माहिती समोर येत असून आता दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी वसमत शहरातील श्री. कृष्ण मंगल कार्यालय येथे लकी ड्रॉ स्कीम चे जाळे पसरवले आहे.
पाचोरा व पूर्णा येथे लकी ड्रॉ न काढताच पळ काढलेल्या याच टोळीने आता पूर्णा शहरात मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाने पुन्हा एकदा लकी स्कीम सुरु केली असून १५००/०० रुपये प्रमाणे हजारो कुपनांची विक्री केली असून हा लकी ड्रॉ वसमत येथील श्री. कृष्ण मंगल कार्यालय नवोदय विद्यालय रस्त्यावर होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र हे मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाखाली ठिकठिकाणी भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करत असल्याने हा लकी ड्रॉ त्वरित थांबण्यासाठी कायद्याच्या रक्षकांनी तडकाफडकी कारवाई करावी व जनतेची लाखो रुपयांची होणारी फसवणूक थांबण्यासाठी या मातोश्री इंटरप्रासेसचा मास्टरमाइंड सुदाम खलाडे याच्यावर कडक कारवाई करुन पाचोरा व पूर्णा येथील फसवणूक झालेल्या जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परंतु लकी ड्रॉ चे कुपन घेऊन फसवणूक झाल्याप्रकरणी मातोश्री इंटरप्रासेसच्या विरोध अद्यापपर्यंत कोणीही तक्रार दाखल केली नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले जात असली तरी मात्र पाचोरा शहरातील व पाचोरा तालुक्यातील काही कुपन धारक लवकर तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.