वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२५
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडणूकीच्या कालावधीत मते मिळवून घेण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी गावागावात विविध विकासकामे मंजूर करुन घेत त्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन त्या कामांची सुरुवात करण्यात आली असून काही विकास कामांचे भुमी पूजन करुन त्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
****************************************************
कार्यकर्ते बनले ठेकेदार विकास कामात भ्रष्टाचार.
****************************************************
परंतु हि विकासकामे करुन वचनपूर्ती करत असतांनाच आपल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी व मोठे करण्यासाठी या विकासकामांचे ठेके देऊन त्यांना ठेकेदार बनवण्यात आले आहे. यामुळे ज्यांना बांधकामांचा कोणताही अनुभव नसल्याने तसेच विकास कामांमध्ये ठरवून दिलेल्या अटी, शर्ती व नियमानुसार कामे न करता फक्त आणि फक्त पैसा कमावणाच्या नादात जवळपासच्या नदी, नाल्यांची वाळू (रेती) बांधकामासाठी वापरणे, हलक्या प्रतीचे सिमेंट वापरुन बांधकाम करतांना सिमेटचे प्रमाणात कसर ठेवणे, बांधकामासाठी लागणारे लोखंडी साहित्य कमी प्रतिचे व कमी प्रमाणात वापरणे, बांधकाम झालेल्या वास्तूवर पाणी न मारणे असा गैरप्रकार काही ठिकाणी राजरोसपणे केला जात आहे.
हा गैरप्रकार पाहून सुज्ञ नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन किंवा आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून आलेली विकासकामे चांगल्याप्रकारे झाली पाहिजे म्हणून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रयत्नशील असतात व ते सत्यात जाणून घेण्यासाठी किंवा सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात.
परंतु हे करत असतांना पैसा कमावण्याच्या नादात जे कार्यकर्ते ठेकेदार बनले आहेत ते या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याने ते वृत्त संकलनासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना योग्य माहिती देत नाहीत व आम्ही कामे करत आहोत *दार, *सदार, आमच्या खिशात आहेत असे समजून ते वागत असल्याचा अनुभव सद्यस्थितीत सगळीकडे अनुभवायला येत असून संबंधित लोकप्रतिनिधी, जबाबदार अधिकारी व कर्मचारी तसेच ठेकेदार यांचे संगनमताने ही कामे होत असल्याने होत असलेल्या व झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय असा आरोप सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.
असाच काहीसा प्रकार जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडला असून या पहूर कसबे गावासाठी २५/१५ योजनेअंतर्गत सभामंडपाच्या बांधकामासाठी ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून वाघूर नदीकाठी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ या सभामंडपाचे बांधकाम सुरु करण्यात आले असून या बांधकामाबाबत जनमानसातून कुजबुज सुरु झाली आहे. याची दखल घेऊन सत्यता पडताळून घ्यावा पहूर येथील दिशा लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी सभामंडपाच्या बांधकामाच्या ठिकाणी गेले असता त्यांना त्याठिकाणी जी वास्तू बांधली जात आहे त्या वास्तूच्या बांधकामांचे माहिती फलक दिसून न आल्याने सभामंडपाच्या बांधकामाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला.
यावेळी बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित असलेले जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती, जय मॉ सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव घोंगडे यांनी संबंधित प्रतिनिधीला हवी असलेली योग्य माहिती न देता सत्यता लपवून ठेवण्याच्या हेतूने उडवाउडवीची उत्तरे दिली ही बाब लक्षात येताच दिशा लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी स्वताजवळ असलेल्या मोबाईलमध्ये होत असलेल्या बांधकामांचे छायाचित्रण सुरु केले हे पाहून बाबुराव घोंगडे यांना राग आला व त्यांनी वृत्त संकलन करत असतांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सहसचिव शंकर रंगनाथ भामरे यांचा मोबाईल हिसकावून घेत वृत्त संकलन करण्यास मज्जाव केला असल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर दिशा लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सह सचिव यांनी बाबूराव घोंगडे यांच्या विरोधात पहूर पोलीस स्टेशनला रितसर लेखी निवेदन देऊन तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर येत असून जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांच्या संघटना व सर्व प्रतिनिधी जिल्हाभरात या घटनेचा निषेध नोंदवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.