उद्यापासून हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड महामार्गावर हेल्मेट सक्ती.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२५
दुचाकी अपघातात मृत्यू रोखण्यासाठी ३ फेब्रुवारी २०२५ सोमवारपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांसाठी ही हेल्मेट सक्ती करण्यात आली असून, चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे.
हेल्मेट नसल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड होणार आहे. १ जानेवारी २०२५ शनिवारपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्याविषयी आदेश काढण्यात आले. यामध्ये दुचाकीस्वारांना सवय लागणार यासाठी महिनाभर कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली नव्हती, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी असून शहरात हेल्मेट सक्ती नसली तरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर, महामार्गावरील तसेच चौकांमध्ये हेल्मेट सक्ती राहणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.