शेतकरी संघटना व जागृत जनमंचच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी दिनांक ३१ जानेवारी शुक्रवार रोजी भडगाव येथे रास्तारोको आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२५
भडगाव तालुका शेतकरी संघटना व जागृत जनमंचच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी शासन व प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही काहीच फायदा होत नसल्याने या कुंभकर्ण झोपेतील शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी भडगाव येथील पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटना, जागृत जनमंच व महाराष्ट्र जलपरिषदेचे भडगाव तालुकाध्यक्ष श्री. अभिमान हटकर व शेतकरी संघटनेचे भडगाव तालुका कार्याध्यक्ष, महाराष्ट्र जागृत जनमंचे सदस्य, महाराष्ट्र जलपरिषदेचे भडगावचे खजिनदार श्री. अनिल पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून दिला आहे.
कारण भारत हा शेतीप्रधान देश म्हटल्या जात असलातरी या देशात शासनामार्फत शेतकऱ्यांचा शेतमालाची योग्य भाव देऊन शासकीय खरेदी केली जात नसल्याने व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. म्हणून शेतकऱ्यांच पांढर सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची शासनाने प्रती क्विंटल १००००/०० हजार रुपये भावाने तसेच सोयाबीनला प्रती क्विंटल १००००/०० रुपये भाव देऊन खरेदी करावी, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, ०१ फेब्रुवारी २०२५ पासून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करण्यात येऊन सन २०२३ व २०२४ च्या पिकविण्याची रक्कम त्वरित मिळावी, भडगाव तालुक्यात सट्टा, पत्ता, जुगार, अवैध दारुची निर्मिती व विक्री कायमस्वरुपी तात्काळ बंद करुन व्यसनाच्या आहारी जाऊन दररोज शेकडो घरांची होणारी बर्बादी थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, शेत पाणंद रस्त्याची कामे त्वरित सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा मागण्या याठिकाणी मांडल्या जाणार असून या मागण्यांची पुर्तता होईपर्यंत हे आंदोलन सुरुच रहाणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
म्हणून भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मिळवून घेण्यासाठी व शासनाला जागे करण्यासाठी या रास्तारोको आंदोलनाला जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे.