अवैध धंदे बंद करुन नागरीसुविधा उपलब्ध करुन द्या, जारगाव सुदामा रेसिडेन्सी येथील नागरिकांचे बेमुदत उपोषण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२५
पाचोरा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जारगाव येथील सुदामा रेसिडेन्सी परिसरात सुरु असलेले अवैध धंदे कायमस्वरुपी तात्काळ बंद करुन सुदामा रेसिडेन्सी येथील रहिवाशांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात या मागणीसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जागे करण्यासाठी दिनांक ०२ जानेवारी २०२५ गुरुवर रोजी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले होते व निवेदनाद्वारे समस्या सोडविण्यासाठी मागणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आम्ही तुमच्या समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या शब्दाप्रमाणे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आश्वासनपूर्ती केली नसल्याने आजही सुदामा रेसिडेन्सी परिसरात दिवसाढवळ्या अवैध धंदे सुरु असून येथील रहिवाशांना नागरीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत.
म्हणून या मागण्या सोडण्यासाठी व संबंधित विषयाला जबाबदार असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समितीच्या माध्यमातून २३ जानेवारी २०२५ गुरुवर पासून पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असून आज २६ जानेवारी २०२५ रविवार प्रजासत्ताकदिनी तिसरा दिवस उजाडला असल्याने एका बाजूला प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत असले तरी आजही सर्वसामान्य प्रजेला आपले हक्क मिळवून घेण्यासाठी आंदोलन करावे लागते ही खेदाची बाब असून तीसरा दिवस उजाडला असलातरी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांकडे साधे ढुंकूनही पाहिले नसल्याने आंदोलन कर्ते संतप्त झाले असून या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा देणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवला आहे.
या बेमुदत उपोषणस्थळी सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समिती सदस्य नीलिमा परदेशी, शीतल विजय तावडे, विजय नथ्यु तावडे, रत्ना उमाळे, ज्ञानेश्वर उभाळे, रामधन परदेशी, संगीता परदेशी, संदीप चौधरी, अनिता चौधरी, दीपराज पाटील, युवराज पाटील, संदीप पाटील, छाया पाटील, गोपीचंद पाटील, शीला पवार, पमाबाई पाटील, नामदेव पाटील, सोनल संघवी, प्रशांत संघवी, मनीषा पाटील, मंगल महाले, योगिता पवार, वंदना बाविस्कर, ज्योत्स्ना पाटील, शरद पाटील, कोमल जाधव, सिद्धार्थ जाधव, वैशाली चैधरी, हर्षल चैधरी, अश्वंती चौधरी, भगवान चौधरी, नूतन चौधरी, पूनम सलगर, बापू अहिरे, वैशाली अहिरे, पूनम कुमावत, निंबा कुमावत, बाळासाहेब कुमावत, सुवर्णा पवार, पूजा पाटील, सुनील पाटील, सचिन उभाळे, वर्षा उभाळे, कविता डोंगरे, किशोर डोंगरे, दिलीप पाटील, सुलोचना पाटील, हरी महाजन यांची उपस्थिती होती.