नंदीचे खेडगाव येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील नंदीचे खेडगाव येथील शेतकरी रामा बळीराम ढमाले (पाटील) वय वर्षे ४७ यांचा दिनांक २४ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी शेतात काम करत असतांनाच सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदीचे खेडगाव येथील शेतकरी रामा बळीराम ढमाले (पाटील) वय वर्षे ४७ हे दिनांक २४ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी पत्नी, मुलासह नियमितपणे शेतात गेले होते. शेतात काम करत असतांनाच त्यांना काहीतरी लावल्यासारखे वाटले ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले असता त्यांच्या पत्नीने जवळील शेतात असलेले नातेवाईक श्रीराम ढमाले यांना व दोघांनी रामा ढमाले यांना सोबत घेऊन उपाचारासाठी घेऊन जात असतांनाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली असून रामा ढमाले यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन मुले व एक सुन असा यांचा परिवार असून खेडगाव नंदीचे परिसरातील ढमाले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.