राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या नावाखाली अवैध धंदेवाल्यांच चांगभलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२५
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोकं वर काढल असून शहरासह, खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर सट्टा, पत्ता, जुगार, अवैध दारुची विक्री आणि विशेष म्हणजे चक्री नावाचा ऑनलाईन गेमने धुमाकूळ घातला असून या चक्री नावाच्या ऑनलाईन जुगाराच्या खेळात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून या चक्री नावाचा ऑनलाईन गेम खेळणारांच्या आयुष्याची राखरांगोळी होत असून यात अल्पवयीन व तरुण मुलांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने नवीन पिढी बर्बाद होत चालली असून या चक्री वादळाच्या ऑनलाईन गेममध्ये पैसे हारल्यामुळे बऱ्याचशा तरुणांनी आत्महत्या केल्याने सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून हे सर्व अवैध धंदे विशेष करुन चक्री नावाचा ऑनलाईन गेम बंद करण्याची मागणी केली आहे.
***************************************************
राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या नावाखाली अवैध धंदेवाल्यांच चांगभलं, पोलीस प्रशासन हतबल झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.
****************************************************
जळगाव शहरासह, संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोकं वर काढल असून हे अवैध धंदे बंद करण्यासाठी गावागावांतून तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस विभागातर्फे वारंवार कारवाई केली जात असली तरीही आजही या अवैध धंदे करणारांना राजकीय नेते व पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने बऱ्याचशा ठिकाणी कायद्याच्या रक्षकांची इच्छा असूनही ते कारवाई करु शकत नाहीत अशी माहिती समोर येत आहे .
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता अवैध धंदे करणारे व काही राजकीय नेते व पुढाऱ्यांचा या अवैध धंदे करणारांना छुपा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते मात्र काही राजकीय नेते व पुढाऱ्यांचा या अवैध धंदे करणाऱ्यांशी तिळमात्र संबंध नसून हे अवैध धंदे करणारे फक्त आणि फक्त पोलीसांवर दबाव आणण्यासाठी परस्पर खोटेनाटे बनाव करत असल्याचे दिसून येते तसेच आजच्या परिस्थितीत राजकीय नेते व पुढाऱ्यांच्या नावाखाली अवैध धंदे वाले स्वताच चांगभलं करुन घेत असल्याने, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.