पाचोरा येथील गो. हे. हायस्कूलमध्ये कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताहास प्रारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२५
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूल या विद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक यांच्या निर्देशानुसार कॉपीमुक्त अभियान अंतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या जनजागृती सप्ताहात पालक व विद्यार्थ्यांना अभ्यास करुन उत्तीर्ण होण्यामागचे फायदे समजावून सांगत कॉपी करुन जरी उत्तीर्ण होता येते हा उद्देश विद्यार्थ्यांनी डोक्यातून काढून टाकावा कारण आयुष्यात, भविष्यात आपण जेव्हा कुठेतरी उभे रहातो तेव्हा त्याठिकाणी आपल्याला आपल्यातील उणीव लक्षात येते परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते म्हणून कॉपी करुन उत्तीर्ण झाले तरी वेळेवर आपल्या डोक्यात काहीच नसल्याने ऐनवेळी मोठी अडचण निर्माण होते. तसेच कॉपी करुन उत्तरपत्रिका सोडवतांना आपण पकडले जाऊ का ? या तणावाखाली कधी, कधी माहिती असलेले महत्वाचे प्रश्न सोडवले जात नाहीत व वेळ संपते म्हणून चांगला अभ्यास करुन तणावमुक्त वातावरणात कॉपीमुक्त परिक्षा द्यावी असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील सरांनी मार्गदर्शन करतांना केले.
या कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाच्या सुरवातीला कॉपीमुक्त जनजागृती रॅली काढण्यात येऊन उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील सरांनी प्रास्ताविक मांडले. या कार्यक्रमाच्या शेवटी श्री. डी. डी. पाटील सरांनी दहावीच्या बोर्डांच्या परिक्षेत कॉपीमुक्त वातावरणात सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ दिली. तसेच श्री. बी. एस. पाटील सरांनी कॉपी केल्यास काय दुष्परिणाम होतात हे सांगुन शिक्षा सुचीचे वाचन करुन दाखवले. मॅडम सौ. एस. टी. पाटील यांनी परिक्षाकाळात आरोग्य बिघडणार नाही व विद्यार्थी ऐनवेळी परिक्षेपासून वंचित रहाणार नाही याकरिता आहार व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी श्री. ए. बी. अहिरे सर, सांस्कृतिक प्रमुख श्री. एम. टी. कौडिण्य सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. एम. आर. पाटील सरांनी केले.