अंबे वडगाव येथे २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच बबलू तडवी यांनी केले आहे.
कारण या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या समस्या असल्यास त्या ऐकुन घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच वर्षानुवर्षांपासून सुरु असलेलें रस्त्यांचे वाद तसेच शेतात जाण्यायेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पाणंद रस्ते, शेत शिवार व वहिवाट रस्ते मोकळे करुन घेण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर चर्चा, पोखरा समीती गठीत करण्यात येणार असून अंबे वडगाव शिवाराच्या विभागाच्या बाबतीत ठराव करुन संबंधित विभागाकडे पाठविणे व ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या ग्रामसभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंबे वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बबलू तडवी यांनी केले आहे.