अधिकाऱ्यांनो अंगातील मरगळ झटका, नाहीतर बसेल कारवाईचा फटका, आ. किशोर आप्पा पाटील यांनी सुनावले खडे बोल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०१/२०२५
सद्यस्थितीत सगळीकडेच शासकीय अधिकारी व कर्मचारी हे मनमानी कारभार करत असून यात महत्त्वाचा भाग म्हणजे आजच्या बरेचसे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने त्यांना स्थानिक अडीअडचणी समजून येत नाहीत व दररोज बाहेरगावाहून मुख्यालयात येण्याजाण्यासाठी वेळ खर्ची होतो व ते वेळेवर कार्यालयात उपस्थित होऊ शकत नसल्याने त्यांना सोपवून दिलेली कामे वेळेवर होत नाहीत व यामुळे तालुक्यातील विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
तसेच बरेचसे गरजू लोक आपल्या वैयक्तिक कामानिमित्त संबंधित कार्यालयात येतात व त्यांना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आठ, आठ खुर्चीवर सापडत नसल्याने त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच पाचोरा शहरासह तालुक्यातील गावागावात वाढते अवैध धंदे यातुनच वाढती मुजोरी, वाळू व गौण खनिज उत्खनन व चोरी थांबण्यासाठी व विकासकामे वेळेत होण्यासाठी पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ही आढावा बैठक प्रांताधिकारी मा. भूषण अहिरे, तहसीलदार मा. बनसोडे,उपविभागीय आरोग्य अधिकारी डॉ.सतिष टाक,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, लघु पाटबंधारे विभागाचे श्री. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पोलिस निरीक्षक अशोक पवार, पिंपळगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे, गटविकास अधिकारी समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलाणी, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम. व्हि. तोतावार,सहाय्यक निबंधक पाटील, आगार प्रमुख श्री. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी लांडे, पशू वैद्यकीय अधिकारी, महिला बाल विकास विभागाच्या जिजाबाई राठोड यांचेसह पाचोरा तालुक्यातील शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या आढावा बैठकीत शेत पाणंद रस्ते, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना प्राधान्याने त्वरित पूर्ण करा अन्यथा टंगळमंगळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दांत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. या आढावा बैठकीत पुढे बोलतांना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की शेत पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
तसेच पाणी पुरवठा योजना ह्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल असतांनाही केवळ संबंधित अधिकारी व कंत्राटदारांच्या अनास्थेमुळे ही महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली आहेत. या कामांना मार्च २०२५ अखेर पर्यंत गती न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हापरिषद, पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, वीज वितरण विभातील तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असलेल्या पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आढावा बैठकीत दिला आहे.
तसेच आगामी १९ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अगोदर मतदार संघात उभारलेल्या शिवस्मारकांमध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याआधी रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याने सर्व ग्रामपंचायतींनी येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी गणराज्य दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ग्रामस्थांमध्ये कराव करण्याच्या सुचना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
याच आढावा बैठकीत ग्रामीण भागातील रर्जोन्नती व पर्यटन विकासाअंतर्गत बहुळा धरण, काकण बर्डी, पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर, पिंपळगाव हरेश्वर गावासाठी सुसज्ज असे नविन बसस्थानक बांधने, गोठा शेड, ग्रामीण भागातील नद्या व नाल्यावरचे पूल, विजेचे सब स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील जनतेसाठी बस फेऱ्या वाढवणे, कृषी विभागाची व पाचोरा शहरातील मानसिंगका येथील खुला भुखंड, घरे, शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, पाचोरा शहरातील अतिक्रमित घरे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेत त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
तसेच माझी समाजाशी व संबंधित अधिकाऱ्यांशी बांधिलकी असून अधिकाऱ्यांना काम करतांना काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी निःसंकोचपणे सांगाव्यात मात्र कायदेशीर बाबींचा बाऊ करत जनतेला वेठीस धरु नये अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीत सुरवातीला किशोर आप्पा पाटील हे आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल पाचोरा तालुक्याचे प्रांताधिकारी मा. भुषण अहिरे यांनी त्यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार केला.
***************************************************
विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला आमदारांनी दिला शॉक.
***************************************************
आयोजित आढावा बैठकीत विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री. थानवी साहेब हे काही कारणास्तव गैरहजर राहिल्याने त्यांच्या ऐवजी आलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत आलेल्या समस्या व इतर विषयांवर व्यवस्थीत व नेमकी उत्तरे देता न आल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली व यापुढे बैठकीला येतांना परिपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे अशी समज दिली.
या आढावा बैठकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ काटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, समाधान पाटील, आमदारांचे स्वीय साहाय्यक राजेश पाटील, प्रविणजी ब्राम्हणे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.