उद्या पाचोरा तालुक्यात ना. गिरीश भाऊ महाजन, खा. स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२५
महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सगळीकडे विकासकामांचा धडाका सुरु झाला असून यात गाव खेड्यापाड्यातील विकास कामांकडे जास्त लक्ष दिले जात असून याच माध्यमातून उद्या दिनांक १८ जानेवारी २०२५ शनिवार रोजी पाचोरा तालुक्यातील वरखेडी, डांभुर्णी, पिंप्री बुद्रुक प्र. पा. या गावांसह इतर गावांतील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
या विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव लोकसभेच्या माननीय खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते माननीय आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय रावसाहेब पाटील, जिल्हापरिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हापरिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे यांनी दिली असून या विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मधुकर भाऊ काटे यांनी केले आहे.
या विकास कामांमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जळगावच्या माध्यमातून वरखेडी, डांभुर्णी, पिंप्री बुद्रुक, प्र. पा, कुऱ्हाड बुद्रुक, सार्वे, वरखेडी, लासुरे, वाणेगाव, निंभोरी खुर्द, निंभोरी बुद्रुक अशा ४० साखळी रस्त्याचे डांबरीकरण तसेच बुडीत पुलांच्या कामांच्या बांधकामांचा समावेश आहे
आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ काटे यांनी पाचोरा तालुक्यातील गावागावांतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार दळणवळणाची व्यवस्था करण्यासाठी जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन, माननीय खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून ही विकासकामांची गंगा आणली असून या कामांचे भूमिपूजन होऊन या कामांना त्वरित सुरुवात केली जाणार असल्याने या पंचक्रोशीतील गावागावांतील ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन, माननीय खासदार स्मिताताई वाघ, माननीय आमदार किशोर आप्पा पाटील व जिल्हापरिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.